बेकायदेशीर नियुत्यांबाबत धुळे मनपाला औरंगाबाद खंडपीठातर्फे नोटीस

मनपा कर्मचारी शिरीष जाधव यांची माहिती
बेकायदेशीर नियुत्यांबाबत धुळे मनपाला औरंगाबाद खंडपीठातर्फे नोटीस
dhule municipal corporation

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

बेकायदेशिर नियुत्या, पदोन्नतीबाबत उच्च न्यायालयाच्या औंरगाबाद खंडपीठाने धुळे महापालिकेला नोटीस बजावली आहे.

धुळे महापालिकेत झालेल्या नियुक्त्या, समायोजन, पदस्थापना, पदोन्नत्या यामध्ये काही कर्मचार्‍यांच्या सेवा अखंडीत धरुन त्यांना सर्व लाभ देण्यात आले. तर काही या लाभांपासून वंचित आहे. त्यामुळे याबाबत काहींना न्याय मिळाला तर काहींवर अन्याय झाला.

याबाबत धुळे महापालिकेच्या आयुक्तांकडे वेळोवेळी निवेदन अर्ज देवून न्याय देण्याची मागणीही करण्यात आली होती.

मात्र त्यांनी दुर्लक्ष केल्याने महापालिकेचे कर्मचारी शिरीष जाधव यांनी उच्च न्यायालयाच्या औंरगाबाद खंडपीठात चौकशी याचीका क्र.7826/2021 दाखल केली. या याचिकेत बेकायदेशिर नियुक्त्या पदोन्नत्या, पदस्थापना आणि इतर बेकायदेशिर कामांच्या चौकशीची मागणी केली होती.

दि.19 जुलै रोजी याचिकेवर कामकाज होवून उच्च न्यायालयाने शासनाचा नगरविकास विभाग आणि धुळे महापालिकेला 2 ऑगस्ट पर्यंत खुलासा सादर करण्याच्या नोटीसा बजावल्या असल्याची माहिती शिरीष जाधव यांनी दिली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com