धुळे

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलाकडून आईच्या हत्येचा प्रयत्न

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने आई गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घोडदे (ता. साक्री) येथे घडली. येवढ्यावर मुलगा थांबला नाही तर त्याने आईच्या गळ्यातील 50 हजारांची सोनपोत खेचून नेली. याप्रकरणी मुलाविरूध्द साक्री पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

घोडदे येथील रहिवासी सौ.राजश्री कमलाकर क्षिरसागर (वय 55) या काल सकाळी दहा वाजेच्या सुमारास घरातील काम करीत होत्या. त्यादरम्यान त्याचा मुलगा विक्रांत कमलाकर क्षिरसागर हा घरी आला. त्याने आईकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता तीने पैसे दिले नाहीत म्हणून त्याने शिवीगाळ करीत तिचा गळा दाबून तिला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

तसेच आईच्या गळ्यातील 50 हजार रूपये किंमतीची सोनपोत खेचली. मात्र धावपळीत ती अंगणात पडल्याने राजश्रीबाई यांना परत मिळाली. याप्रकरणी त्यांनी साक्री पोलिसात मुलाविरूध्द फिर्याद दिली. त्यानुसार मुलगा विक्रांत क्षिरसागर याच्या विरूध्द भादंवि 307, 392, 323,504 ,506 अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोसई पी. एम. बनसोडे करीत आहेत.

Deshdoot Digital Dhamaka | देशदूत डिजिटल धमाका
www.deshdoot.com