धुळ्यात लाचखोर महिला लेखाधिकारी गजाआड
धुळे

धुळ्यात लाचखोर महिला लेखाधिकारी गजाआड

Balvant Gaikwad

सातव्या वेतन आयोगाचा फरकाच्या रक्कमेचा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यासाठी फरकाच्या रक्कमेतील 994 रूपयांची मागणी करून तडजोडीअंती 700 रूपयांची लाच स्विकारतांना जि.प.च्या शिक्षण विभागाच्या कनिष्ठ लेखाधिकारी संगिता शिंपी यांना रंगेहात पकडण्यात आले. धुळे एसीबीच्या पथकाने आज सायंकाळी ही कारवाई केली.
तक्रारदाराचे वडील नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले होते. त्यांचे 7 वा वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम मिळण्यासाठी शिरपूर पं.स.च्या गट विकास अधिकारी जि.प.तील शिक्षण विभागात प्रस्ताव पाठविला होता. तेव्हा तेथील लिपीक संगिता शिंपी यांनी 7 वा वेतन आयोगाचा फरक 49 हजार 934 रूपये मंजुरीसाठी प्राप्त झाल्याचे संगणकावर दाखवून प्रस्ताव मंजुरीसाठी कोषागार विभागास पाठविण्यासाठी फरकाच्या रक्कमेतील 934 रूपये लाचेची मागणी केली. या तक्रारीनुसार एसीबीच्या पथकाने पडताळणी केली. त्यादरम्यान संगिता शिंपी यांनी तक्रारदाराकडे तडजोडीअंती 700 रूपयांची मागणी केली. त्यानंतर आज जि.प. कार्यालयाबाहेर पार्कींग जवळ पैसे स्विकारल्यानंतर एसीबीच्या पथकाने शिंपी यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी शहर पेालिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
ही कारवाई एसीबीचे उपअधिक्षक सुनिल कुराडे, निरीक्षक मनजितसिंग चव्हाण, प्रकाश झोडगे व त्यांच्या पथकातील पोहेकाँ जयंत साळवे, संतोष हिरे, सुधीर सोनवणे, संदीप सरग, प्रशांत चौधरी आदींनी केली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com