जिल्ह्यात आणखी ८६ रुग्ण पॉझिटिव्ह
धुळे

जिल्ह्यात आणखी ८६ रुग्ण पॉझिटिव्ह

जिल्ह्याची रूग्ण संख्या 3 हजार 422

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात कोरोनाने आज दोन जणांचा बळी घेतला. शिरपूर येथील 52 वर्षीय, 55 वर्षीय पुरुषाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. दोघांवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होते.

दरम्यान जिल्ह्यात नव्यात 86 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 3 हजार 422 एवढी झाली असून आतापर्यंत 2 हजार 200 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

दुपारी चार वाजता महापालिका पॉलिटेकक्निक मधील 100 अहवालांपैकी 18 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. त्यात जुने धुळे तीन, चितोड रोड एक, संभाप्पा कॉलनी दोन, सुपडूआप्पा कॉलनी एक, सुभाष नगर पाच, मोराणे एक, शिवाजी नगर एक, सत्य साईबाबा सोसायटी एक, उत्कर्ष कॉलनी एक, पाच कंदील दोन या रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी लॅबमधील आठ अहवालांपैकी पाच अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात महात्माजी नगर साक्रीरोड एक, धुळे तीन, जमनागिरी रोडवरील एका रुग्णांचा समावेश आहे.

सायंकाळी साडेसहा वाजता जिल्हा रुग्णालयातील 21 अहवालांपैकी 13 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात मोहाड़ी 4, आदर्श कॉलनी, साक्री रोड, मोराणे, जुने धुळे, वलवाड़ी शिवार, भगवती नगर देवपुर, दत्त मंदिर चौक, धनाई पुनाई कॉलनी, अनुजा सोसायटी व नकाने रोडवरील प्रत्येक एका रूग्णाचा समावेश आहे.

शिरपूर उपजिल्हा रुग्णालातील 93 अहवालांपैकी 19 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यात बालाजी नगर शिंगावे 3, भोई गल्ली शिरपुर 2, बोहरा मस्जिद 1, भोरटेक 4, शिरपुर 3, वाडी बु.1, बंसीलाल नगर 1, अहिल्यापुर 1, दहिवद 1, थाळनेर 1 व होळनांथेतील एक रूग्ण आहे.

भाडणे ता. साक्री सीसीसी केंद्रातील 22 अहवालांपैकी शिवाजी चौक बेहेड येथील एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

रात्री आठ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 62 अहवालांपैकी 30 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. यात इंटर्न होस्टल जीएमसी 2, मुल्ला कॉलनी 1, भाईजी नगर 1, साक्री रोड 2, वाड़ीभोकर रोड 1, नकाने रोड 1, स्टेडियम जवळ 1, सिंचन भवन 1, सेवा हॉस्पिटल 1, सिद्धिविनायक हॉस्पिटल 2, धुळे 9, विशाल कॉलनी 1, शिरपुर 2, साक्री 1, शिंदखेड़ा 1, कुसुंबा 1, मुकटी 1, अंबोडे 1 तसेच झोडगे ता. मालेगाव 2, जळगाव 1, ठाणे येथीले एक रूग्ण आहे. जिल्ह्यात आतापर्यत तीन हजार 422 कोरोना बाधीत आढळले आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com