धुळे : अज्ञात वाहनाची मोटर सायकलला धडक
धुळे

धुळे : अज्ञात वाहनाची मोटर सायकलला धडक

एक गंभीर, दोन जण जखमी

Rajendra Patil

धुळे/कुरखळी - वार्ताहर Dhule

मुंबई-आग्रा महामार्गावर आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास धुळ्याहुन शिरपूरच्या दिशेने येणाऱ्या मध्यप्रदेशातील मोटरसायकल स्वाराला अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात एक जण गंभीर जखमी तर इतर दोन जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे.

एमपी ४६ एम क्यू ३१७९ या क्रमांकाची मोटरसायकल धुळ्याहून शिरपूरच्या दिशेने जात असतांना दभाषी (ता. शिंदखेडा) गावाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत निलंज्या राहिल्या पावरा (२९), हे गंभीर जखमी झाले असून नान्या राहिल्या पावरा (१०), व गणेश राहिल्या पावरा (६) हे किरकोळ जखमी आहेत. त्याच्यावर शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते.

एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला धुळे येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com