मृतदेह घेवून जाणारी रूग्णवाहिका उलटली, नातेवाईक ठार

मृतदेह घेवून जाणारी रूग्णवाहिका उलटली, नातेवाईक ठार

शिंदखेडा तालुक्यातील घटना

धुळे | प्रतिनिधी Dhule

सिल्वासा येथून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेवून येणार्‍या रुग्णवाहिकेचा शिंदखेडा तालुक्यातील वालखेडा शिवारात अपघात झाला. भरधाव रूग्णवाहिका रस्त्याच्या कडेला उलटल्याने मृतदेह घेवून जाणारा नातेवाईक जागीच ठार झाला.तर चालक गंभीर जखमी झाला आहे.

काल सायंकाळी हा अपघात झाला. याप्रकरणी नरडाणा वाहन चालकावर गुन्हा दाखल झाला आहे. अनिल शिवाजी पवार (वय ४४ रा. कमखेडा ह.मु सिल्वासा) असे मयताचे नाव आहे. त्याचे नातेवाईक राजेंद्र देविदास पाटील (रा.जवखेडा) यांचा मृत्यू झाल्याने त्यांचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी अनिल हा रूग्नवाहिकेव्दारे (क्र.जी.जे.१५ वाय.वाय.९८२६) जवखेडा गावी नेत होता. काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास रुग्णवाहिका जवखेडाकडे जात असतांना वालखेडा गाव शिवारात भरधाव रुग्णवाहिकेवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे रूग्णवाहिका चारीत जावून उलटली.

त्यात रुग्णवाहिकेतील अनिल पवार हे जागीच ठार झाले. तर चालक गंभीर झाला आहे. त्याचे नाव समजू शकलेले नाही. अपघाताची माहिती कळताच संबंधीतांनी घटनास्थळी धाव घेतली. अनिल पवार यास नरडाणा येथील रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मयत घोषीत केले. याप्रकरणी दिलीप रामदास पवार (रा.कमखेडा) यांच्या फिर्यादीवरून रूग्णवाहिका चालकाविरोधात नरडाणा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पो.कॉ.संजय देसले करीत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com