मालनगाव मध्यम प्रकल्पावर जल आंदोलन

मालनगाव मध्यम प्रकल्पावर जल आंदोलन

पिंपळनेर - Pimpalner - वार्ताहर :

येथील मालनगाव मध्यम प्रकल्पावर आज जल आंदोलन करीत बंदीस्त जलवाहिनीने पाणी देण्यास तीव्र विरोध दर्शविण्यात आला.

यापुढे यापेक्षा मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असेही ठरविण्यात आले. आंदोलनात लाभक्षेत्रातील हजारो शेतकर्‍यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते के.टी.सूर्यवंशी, भाजपाचे मोहन सूर्यवंशी, काँग्रेसचे अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, पं.स.सदस्य मनोज जगताप, शिवसेना दहिवेल विभाग मंगलदास सुर्यवंशी, सरपंच अविनाश बच्छाव, सामाजीक कार्यकर्ते राजू राऊत, पेसा संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश पवार व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

पेसा संघर्ष समितीच्या नेतृत्वात हे जलआंदोलन यशस्वी झाले.जयसचे अध्यक्ष कुंदन गांगुर्डे व सर्व पदाधिकारी, आदिवासी बेधडक, आदिवासी बचाव अभियान, संकल्प ग्रुपचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते.

यावेळी अप्पर तहसीलदार अनिल उचाळे, चेतन सैंदाणे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com