धुळे महापौर निवडीच्या हालचालींना वेग

भाजपाला धक्का देण्यासाठी विविध पक्षांच्या बैठका सुरु
धुळे महापौर निवडीच्या हालचालींना वेग

धुळे Dhule । प्रतिनिधी

धुळे महापौर (Mayor) निवडीसाठी (election) राजकीय हालचालींना(Political movements) वेग आला आहे. भाजपाचे (Bjp) महापालिकेवर वर्चस्व असल्यामुळे त्यांचाच महापौर होईल. परंतू भाजपाला धक्का (Push the BJP) देण्यासाठी विरोधी पक्षही (Opposition too) एकत्रित येवून महापौर पदासाठी उमेदवार देण्याची शक्यता आहे. त्यामुळे चुरस(Churas) निर्माण होईल.

चंद्रकांत सोनार यांचा महापौर पदाचा अडीच वर्षाचा कालावधी संपल्यामुळे महापौर निवडीसाठी निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनी हालचाली सुरु केल्या आहेत. महापालिकेवर भाजपाचे वर्चस्व असून 50 नगरसेवक भाजपाचे आहेत. त्यामुळे भाजपाचाच महापौर होईल.

पक्षश्रेष्ठी ठरवतील त्याची वर्णी महापौर पदासाठी होईल. असे असले तरी विरोधकांनी भाजपाला धक्का देण्यासाठी तयारी सुरु केली आहे. जळगाव पॅटर्न वापरुन विरोधक फुटाफुटीचे राजकारण करुन महापौर बसविण्याच्या तयारीत आहेत. त्याला किती यश येते हे महापौर निवडीनंतर स्पष्ट होईल.

भाजपातर्फे बालीबेन मंडोरे, प्रतिभा चौधरी, प्रदीप कर्पे, नरेश चौधरी, युवराज पाटील यांचे महापौर पदासाठी नाव शर्यतीत आहे. परंतू पक्षश्रेष्ठी कोणाचे नाव ठरवतात हे उद्या दि. 13 सप्टेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

महापौर निवडीची प्रक्रिया सुरु

महापौर निवडीची प्रक्रिया दि. 11 सप्टेंबरपासून सुरु झाली आहे. दि.13 सप्टेंबर रोजी अर्जांची स्वीकृती केली जाईल. तर दि. 17 सप्टेंबर रोजी महापौर निवडीसाठी विशेष महासभा पीठासीन अधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली होईल. त्या सभेत महापौर कोण होईल हे स्पष्ट होईल.

सहा इच्छूकांनी घेतले अर्ज

महापौर पदासाठी इच्छूक असलेल्या अपक्ष नगरसेवक मोमीन आसिफ मोमीन आसिफ इस्माईल यांनी दोन अर्ज, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नगरसेविका मदिना समशेर पिंजारी यांनी दोन तर एमआयएमच्या नगरसेविका अन्सारी सईदा इकबाल गणी यांनी एक अर्ज दि. 11 सप्टेंबर रोजी घेतला, तर भाजपाचे संजय रामदास पाटील यांनी दोन, प्रदीप बाळासाहेब कर्पे तीन, प्रतिभा चौधरी यांनी तीन अर्ज दि. 12 सप्टेंबर रोजी घेतला.

निरिक्षकांनी घेतला आढावा

भारतीय जनता पक्षाच्या निरीक्षकांनी शनिवारी भाजपाच्या नगरसेवकांची वैयक्तीक संवाद साधला. याबाबत ते पक्षश्रेष्ठींना अहवाल देणार आहेत. निरिक्षक तथा आमदार योगेश सागर, सहनिरिक्षक लक्ष्मण साहूजी, प्रदीप पेशकार यांनी एका हॉटेलमध्ये भाजपाच्या 50 नगरसेवकांशी संवाद साधला आहे.

महाविकास आघाडीही आघाडीवर

महापौर पद मिळण्यासाठी महाविकास आघाडीही पुढे आली आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी, समाजवादी पार्टी, बसपा या प्रमुख पक्षांशी चर्चा सुरु आहे. तसेच विरोधी नगरसेवकांच्या बैठकाही घेतल्या जात आहेत. विरोधी गटातील काही नगरसेवकांनी अर्जही घेतले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com