दोंडाईचा - Dondaicha - श.प्र :

दोंडाईचा-धुळे रस्त्यावर उपनगराध्यक्ष रवि उपाध्ये यांच्या मालकीच्या अभिषेक जिनिंगला आग लागली. आगीत वीस ते पंचवीस लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

या आगीत गाठीच्या प्रकियेतील आणि साठवलेल्या कापस जळून खाक झाला. कापसाच्या गाठीना शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

तत्पूर्वी आज पहाटे जिनिंगचे मालक रवींद्र उपाध्ये यांनी प्रेसिंग युनिटची पाहणी करतांना काही तरी जळण्याचा वास येत असल्याने संबंधित युनिट त्वरित बंद केल्यामुळे मोठा अनर्थ टळला.

आ.जयकुमार रावल, सीसीआयचे अधिकारी आदित्य वामन, भदोरीया, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव पंडित पाटील, सीसीआय संबंधित कर्मचारी, विलास पाटील, नाना पाटील, रवींद्र गिरासे राकेश अग्रवाल, नगरसेवक आदींनी घटनास्थळी भेट दिली. तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण पाटील सहसचिव विजय पाटील यांनी देखील नुकसानीची माहिती घेतली.

सदर आगीत वीस ते पंचवीस लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. साधारण 170 प्रतिकिलो प्रमाणे शंभर ते सव्वाशे गाठींना आग लागली.

प्रती गाठीची किंमत जवळपास 20 हजार आहे.शॉट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे.

अभिषेक जिनिंग आणि प्रेसिंग कंपनीचे मालक घटना स्थळी दाखल झाले घटनेची माहिती त्यांनी संबंधित विभागाला दिली.

त्यानंतर दोंडाईचा पालिका, शिंदखेडा येथील अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.