लळींग शिवारातील डोहात बुडून युवकाचा मृत्यू

लळींग शिवारातील डोहात बुडून युवकाचा मृत्यू

धुळे Dhule। प्रतिनिधी

तालुक्यातील लळींग शिवारातील Laling Shivar डोहात पोहण्यासाठी उतरलेल्या युवकाचा Youth पाण्यात बुडून drowning in मृत्यू death झाला. आज सकाळी ही घटना समोर आली. याबाबत मोहाडी पोलिसात नोंद झाली आहे.

कुंदन किशोर चावरे (वय 17 रा. रासकर नगर, धुळे) असे मयत युवकाचे नाव आहे. तो नातेवाइकांसह दि.27 ऑगस्ट रोजी दुपारी कारने लळींगला आला होता. गाव शिवारात एका डोंगरावर असलेल्या खंडेरावाचे त्याने दर्शन घेतले. या डोंगराच्या पायथ्याशी डोह आहे. दर्शनानंतर डोंगरावरुन खाली आलेल्या कुंदनसह त्याच्या आतेबहिणीचे पती पोहण्यासाठी डोहात उतरले.

परंतू पाण्याचा अचूक अंदाज न आल्यामुळे कुंदन पाण्यात बुडाला. नातेवाईकांसह स्थानिक नागरिकांनी डोहात कुंदनचा शोध सुरू केला. काही वेळानंतर एका कपारीमध्ये तो मिळून आला. त्याला हिरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासून त्यास मृत घोषीत केले.

याबाबत लखन किशोर चावरे यांनी दिलेल्या माहितीवरुन मोहाडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. घटेनमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com