पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा डोहात बुडून मृत्यू

पोहण्यासाठी गेलेल्या तरूणाचा डोहात बुडून मृत्यू

धुळे । Dhule । प्रतिनिधी

डोहात पोहण्यासाठी गेलल्या तरूणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. आज सकाळी शहरानजीक असलेल्या वडेल रोडवर ही घटना घडली. याबाबत पश्चिम देवपूर पोलिसात नोंद झाली आहे.

दिलीप सोमा चव्हाण (वय 26 रा. आदिवासी वस्ती, भोकर ता. धुळे) असे मयताचे तरूणाचे नाव आहे. तो आज सकाळी वडेल रोडवरील डोहात पोहण्यासाठी गेला होता. पाण्यात उतरल्यानंतर त्याला अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांसह तरूणाच्या नातेवाईक व मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. पट्टीच्या पोहणार्‍यांच्या मदतीने तरूणाला डोहातून बाहेर काढण्यात आले. त्याला रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. याबाबत महारू ठाकरे यांच्या माहितीवरून पश्चिम देवपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com