झाडावरून पडून युवकाचा मृत्यू

जांभूळ तोडण्यासाठी चढला होता झाडावर
झाडावरून पडून युवकाचा मृत्यू
USER

साक्री - प्रतिनिधी Dhule

कासारे येथे आज दि.5 रोजी सकाळी अमरधाम येथे एक युवक जांभूळ तोडण्यासाठी झाडावर चढलेला असताना त्याचा वरून पाय घसरल्याने तो खाली काँक्रीटच्या संरक्षक भिंतीवर (Protective wall) पडला व त्याचा जागीच मृत्यू झाला.

मयत युवकाचे नाव विशाल रवींद्र खरात (वय 25 वर्षे) आहे त्याच्या पश्चात पत्नी व आई आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य गोकुळसिंह परदेशी तसेच ग्रामपंचायत सदस्य तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर घटनास्थळी साक्री पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक प्रल्हाद बनसोडे, पोलीस कॉन्स्टेबल उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com