गायींची तस्करी राेखली
धुळे

गायींची तस्करी राेखली

शिरपूर तालुका पोलिसांची कामगिरी

Rajendra Patil

ट्रकमधील दोन कप्प्यांमध्ये बांधलेल्या ५१ गुरांची सुटका

१५ गुरे आढळली मृतावस्थेत

धुळे - प्रतिनिधी Dhule

जिल्ह्यात पोलिस अधिक्षक चिन्मय पंडीत यांच्या आदेशानुसार पहाटे तीन ते पाच वाजेदरम्यान ऑलआऊट व कोबींग ऑपरेशन राबविण्यात आले. या मोहिमेदरम्यान शिरपूर तालुका पोलिसांनी आज पहाटे ट्रकमधुन होणारी गोवंशची तस्करी रोखली.

ट्रकमध्ये दोन कप्प्यांमध्ये निदर्यपणे बांधलेल्या १० लाख २० हजार रूपये किंमतीच्या ५१ गुरांची सुटका करण्यात आली.

सहाय्यक पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पहाटे साडेचार वाजेच्या सुमाराम मुंबई-आग्रा महामार्गावरील पळासनेर येथे नाकाबंदी करून तपासणी सुरू केली.

त्यादरम्यान नाकाबंदीपासून दोनशे मिटरच्या अंतरावर एका ट्रक चालकाने ट्रक उभी करून अंधारात पसार झाला. पोलिसांनी ट्रकची तपासणी केली असता त्यात ५१ गुरे बांधलेली आढळून आली. त्यापैकी 15 गुरे मयत स्थितीत होती.

पोलिसांनी १० लाख २० हजारांची गुरे व १५ लाखांचा ट्रक असा एकुण २५ लाख २० हजारांचा मुद्येमाल जत्त केला. याप्रकरणी ट्रक चालक व मालकाविरोधात शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com