अंड्याच्या भाजीसाठी...पत्नीवर केला कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला

पतीला अटक, मुलीने दिली वडिलांविरोधात फिर्याद
अंड्याच्या भाजीसाठी...पत्नीवर केला कुर्‍हाडीने जीवघेणा हल्ला

धुळे । प्रतिनिधी Dhule

देवपुरातील (Devpur) नकाणे रोडवरील (Nakane Road) आंबेडकर नगरात अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना घडली आहे. अंड्डयाची भाजी बनवून दिली नसल्याचा राग येऊन पतीने पत्नीवर कुर्‍हाडीने प्राणघातक हल्ला केला.

त्यात पत्नी गंभीर झाली असून पोलिसांनी पतीला अटक केली आहे. याबाबत मुलगी भाग्यश्री राजेंद्र नेतकर (वय 19 रा. स्टेशन रोड, धुळे ह.मु आंबेडकर नगर, नकाणे रोड, धुळे) हिने वडिलांविरोधात तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार काल साडेआठ वाजेच्या सुमारास साहेबराव भिमराव अहिरे (वय 45 रा. आंबेडकर नगर, नकाणे रोड, देवपूर, धुळे) याने पत्नी छायाबाई (वय 40) हिने अंड्यांची भाजी बनवून दिली नाही म्हणून तिच्याशी वाद घातला. घराच्या माळावर ठेवलेली कुर्‍हाड आणून पत्नीला मला तु आज अंडे बनवून दिले नाही, मी तुला जिवेच मारणार आहे, असे सांगत तिच्या डोक्यावर कुर्‍हाडीने वार करत तीला गंभीर जखमी केले.

हल्ला केल्यानंतर साहेबराव हा पसार झाला. याप्रकरणी पश्‍चिम देवपूर पोलिसात साहेबराव अहिरे याच्यावर भादंवि कलम 307 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सैय्यद करीत आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com