धुळे जिल्ह्याचा 99.98 टक्के निकाल

13 हजार विद्यार्थी विशेष प्राविण्यासह
धुळे जिल्ह्याचा 99.98 टक्के निकाल

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्याचा दहावीचा 99.98 टक्के निकाल लागला आहे. त्यात 13 हजार 450 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत.

जिल्ह्यात इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी एकुण 28 हजार 565 विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. त्यात 16 हजार 116 विद्यार्थी व 12 हजार 447 विद्यार्थींनींचा समावेश होता. त्यापैकी 28 हजार 561 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

त्यातही 13 हजार 450 विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, 12 हजार 917 विद्यार्थी प्रथम श्रेणी, 2 हजार 125 व्दितीय श्रेणी व 69 विद्यार्थी पास श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत.

एकुण 99.98 टक्के निकाल लागला आहे. दरम्यान दुपारी एक वाजला निकाल जाहिर झाला. परंतू विभागाचे संकेतस्थळच बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com