धुळे जिल्ह्यात 88 पॉझिटिव्ह रूग्ण
धुळे

धुळे जिल्ह्यात 88 पॉझिटिव्ह रूग्ण

धुळे जिल्ह्याची रूग्ण संख्या 4 हजार 393, मृतांची संख्या 144

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात सोमवारी 88 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उपचार सुरू असतांना फागणेतील 79 वर्षीय पुरूषाचा करोना मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण मृत्यू 144 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या 4 हजार 393 वर पोहोचली आहे.

महापालिका पॉलिकेक्निक सीसीसीमधील 15 अहवालांपैकी जवाहर कॉलनी 1, जवाहर कॉम्प्लेक्स 1, जुने धुळे 1 व सुपडू अप्पा कॉलनीतील दोन अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 38 अहवालांपैकी 9 अहवाल जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. त्यात शासकीय वसाहत फाशी पुल, शांती नगर रेल्वे स्टेशन रोड, दौलत नगर वलवाडी, शिरपुर, देवभाने, गरताड, सोनगीर येथील प्रत्येकी एक व धुळे येथील दोन रूग्णांचा समावेश आहे.

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील 90 अहवालांपैकी 17 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात हुडको कॉ दोंडाईचा, नवा भोई वाडा दोंडाईचा, चैनी रोड दोंडाईचा, शहादा रोड दोंडाईचात, डी.जे.नगर, परासमाल शिंदखेडा, जखमापुर विरदेल, खुडाने शिंदखेडा, धमाणे,अप्पासाहेब नगर, दोंडाईचा, शिंदखेडा प्रत्येकी एक व विखरण शिंदखेडा 2, गरीब नवाज कॉलनीतील दोन रूग्णांचा समावेश आहे.

शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 170 अहवालांपैकी 35 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. भावेर, अर्थे, सर्वथ नगर, करवंद रोड श्री नगर, मांडळ, घ नगर, विद्याविहार कॉलनी, रामसिंग नगर, मार्केट रोड, गुरुदत्त कॉलनी, फुले नगर शिंगावे,शंकर पांडू माळी नगर शिरपुर, सदाशिव नगर, हरी नगर, ताजपुरी, दहिवद शिरपुर, भवानी टेक, तर्‍हाड़ी, वाल्मीक नगर शिरपुरातील प्रत्येकी एक व भवानी टेक 2, महावीर सोसायटी 4, दूध डेअरी कॉ 3, मारवाडी गल्ली 2, बोराडी 2, जैन गल्लीतील दोन रूग्णांचा समावेश आहे.

भाडणे साक्रीतील सीसीसीमधील 64 अहवालांपैकी 20 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. त्यात आमखेल 3, मोरे गल्ली मालपूर 1, बोरसे गल्ली मालपूर 2, पिंपळनेर 2, शिक्षक कॉलनी कासारे 2, मेन रोड कासारे 3, जैताने 1, निजामपूर 3, भवानी नगर पिंपळनेर, बाजार पेठ पिंपळनेर, माळी नगर पिंपळनेर येथील प्रत्येकी एक रूग्ण आहे.

खाजगी लॅबमधील 8 अहवालापैकी पिंपळनेर व साक्री रोडवरील प्रत्येकी एक अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्हाची एकूण रूग्ण संख्या 4 हजार 393 एवढी झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com