धुळे : जिल्ह्यात आढळले ७४ करोना रुग्ण
धुळे

धुळे : जिल्ह्यात आढळले ७४ करोना रुग्ण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात आज एका दिवसात 74 नवीन कोरोना बाधीत आढळून आले. यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 2292 इतकी झाली आहे. बोराडी येथील 75 वर्षीय व्यक्तीचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

शहरातील दोन खासगी लॅबमधील 31 पैकी 17 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात मुकटी दोन, भरतनगर तीन, अभयनगर दोन, कुसुंबा, शिरपूर, शिंदखेडा, पालाबाजार लोहार गल्ली, स्नेहनगर, अग्रवालनगर, चाळीसगाव रोड, नवजीवन ब्लड बँकमागे सुशांत कॉलनी, गवळेनगर प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. तसेच निजामपूर येथील दोन रुग्ण नाशिक येथे पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

रात्री 8 वाजेच्या अहवालानुसार शिरपूर उपजिल्हा रुग्णालयातील 66 पैकी 12 अहवाल पॉझिटिव्ह आढळून आलेत. यात बोराडी चार, होळनांथे दोन तर विद्याविहार कॉलनी, राजपूत वाडा, वाडी, कुवे, अमोदे, लोंढरे येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

मनपाच्या पॉलिटेक्निक केंद्रातून 78 पैकी दहा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या आग्रारोड दोन, एचडीएफसी बँक दोन, भोई गल्ली दोन, एससीपीएम कॉलेज दोन, नगावबारी एक व दत्तमंदीर येथील एका रुग्णाचा समावेश आहे. साक्री तालुक्यातील भाडणेच्या केंद्रातील 54 पैकी 9 अहवाल पॉझिटिव्ह आलेत. यात साक्रीतील मेन चौक, शिवाजीनगर, स्टेट बँक येथील प्रत्येकी एक, कासार्‍यात चार तर विटाईतील दोघांचा समावेश आहे.

जिल्हा रुग्णालयातील 55 अहवालांपैकी दहा अहवाल पॉझिटिव्ह आलेत. यात शहरातील ग.नं.6 तीन, चक्करबर्डी एक, फागणे चार, नरव्हाळ दोन जणांचा समावेश आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील दहा पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये विटाभट्टी, वाडीभोकर रोड, साक्री रोड, फुले कॉलनी, मोराणे, निमगुळ, बाभुळवाडी, साक्री येथील रुग्णांचा समावेश आहे. तर दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयातील चार अहवालांमध्ये शिंदखेड्यातील दोन, जुना भोईवाडा एक व दोंडाईचा येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

वृध्दाचा मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार घेणारा बोराडी येथील 75 वर्षीय पुरुषाचा आज मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत 91 जणांचा बळी गेला आहे.

Deshdoot
www.deshdoot.com