दिवसभरात आढळले 60 रुग्ण; जिल्ह्यातील रुग्ण संख्या 1131

शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नऊ कर्मचारी करोना बाधीत
दिवसभरात आढळले 60 रुग्ण; जिल्ह्यातील रुग्ण संख्या 1131

धुळे - येथील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात नऊ कर्मचार्‍यांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर आज दिवसभरात 60 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याची रुग्ण संख्या 1131 वर गेली आहे.

येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील कोरोना रुग्णांचे स्वॅब तपासणी करणार्‍या प्रयोग शाळेतील चार टेक्निशयन रविवारी कोरोना बाधीत आढळले असून त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालात वैद्यकीय महाविद्यालयातील कोविड सेंटरवरील नऊ आरोग्य कर्मचारी कोरोना बाधीत आढळले आहेत. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णांवर उपचार करणार्‍या डॉक्टर्स व कर्मचार्‍यांमध्ये अस्वस्थात निर्माण झाली आहे.

एकाच दिवशी 60 रुग्ण आढळले

महापालिका पॉलिटेक्निक सीसीसी येथील 39 अहवालांपैकी नऊ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात चाळीसगाव रोड दोन, मोहम्मद्दी नगर दोन, महसूल कॉलनी एक, बालाजी नगर साक्रीरोड एक, नकाणेरोड एक, दौलतनगर देवपूर एक, अमोल नगर, देवपूरातील एकाचा समावेश आहे.

तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 55 अहवालांपैकी 40 धुळे जिल्हयातील व 2 इतर जिह्यातील असे एकूण 42 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात शिरपूर दोन, पिंपळनेर एक, सुतार गल्ली साक्री एक, एसबीएचजीएमसी दोन, श्रीराम नगर तीन, व्हीडब्ल्यूएस कॉलेज जवळ तीन, जय गजानन कॉलनी एक, समतानगर एक, प्रभा कॉलनी एक, मोगलाई दोन, वैभव नगर एक, वलवाडी एक, लोकरेनगर एक, झेडपी कॉलनी एक, विमलनाथ नगर एक, साईदर्शन कॉलनी एक, गौरीशंकर कॉलनी एक व धुळे येथील इतर 16 जणांचा समावेश आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 15 अहवालांपैकी 9 अहवाल पॉजिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात 1131 रुग्ण आतापर्यंत कोरोना बाधीत आढळून आले आहेत. आतापर्यंत एकूण 606 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकूण 57 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com