धुळे : जिल्ह्यात एकाच दिवशी ५० रुग्ण

धोका वाढला , करोना रुग्णांची संख्या १३४६ ; सर्वाधिक धुळे व शिरपूरात बाधीत
धुळे : जिल्ह्यात एकाच दिवशी ५० रुग्ण

धुळे - Dhule- Shirpur

कोरोना महामारीचा जिल्ह्यात धोका वाढला असून एकाच दिवशी 50 रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्याची रुग्ण संख्या 1346 वर पोहचली. त्यापैकी 832 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सोमवारी 29 रुग्ण बरे होवून घरी गेले. धुळे शहर व शिरपूरात सर्वाधिक बाधीत आढळून आले आहेत.

साक्री शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्यानंतर कोरोना महामारीने जिल्ह्यात डोकेवर काढले असून दिवसेंदिवस रुग्ण संख्या वाढत आहे. आज दिवसभरात 50 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील 27 अहवालांपैकी 13 धुळे जिल्ह्यातील व एक शहादा येथील अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात 60 वर्षीय महिला शिंदखेडा, 62 वर्षीय पुरुष नेर, 48 वर्षीय पुरुष चितोडरोड, 21 वर्षीय महिला थाळनेर, 65 वर्षीय महिला वाघाडी, 32 वर्षीय महिला ग.नं.5 धुळे, 50 वर्षीय महिला कुंडाणे, 32 वर्षीय पुरुष नकाणेरोड धुळे, 55 वर्षीय पुरुष कुमारनगर धुळे, 70 वर्षीय पुरुष धुळे, 25 वर्षीय पुरुष धुळे, 28 वर्षीय पुरुष कुमारनगर, 45 वर्षीय पुरुष पवननगर, मोहाडी आणि धामणगाव प्रत्येक एक या रुग्णांचा समावेश आहे. तर नंदुरबार जिल्ह्यातील शहादा येथे 61 वर्षीय पुरुष बाधीत आढळला आहे.

शिरपूरातील 37 अहवाल पॉझिटिव्ह

शिरपूर उपजिल्हा रुग्णालय येथील 141 अहवालांपैकी 37 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात विद्यानगर, सदाशिवनगर, अंबिकानगर प्रत्येकी एक, क्रांतीनगर दोन, देना बँकजवळ पाच, पुरा गल्ली, करवंदनाका, करवंद, बोहरी गल्ली, कलमाडी, शिंदखेडा, साने गुरुजी कॉलनी, महालक्ष्मी कॉलनी, कोडीद शिरपूर प्रत्येकी एक, बालदे, शिरपूर 11 आणि शिरपूर तीन रुग्णांचा समावेश आहे. शिरपूरात 488 बाधीत आतापर्यंत आढळून आले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com