दोंडाईचा । प्रतिनिधी Dondaicha

दोंडाईचा नगरपालिकेचा सर्वसाधारण सभेत दोन लाख 75 हजार 774 रुपये शिलकीचा ,दोन अब्ज 67 कोटी 12 लाख 91 हजार 817 रु खर्चाचा असा दोन अब्ज 67 कोटी 15 लाख 67 हजार 591 रुपयाचे अंदाजपत्रक एकमताने मंजूर करण्यात आले.

नगराध्यक्षा नयनकुवर रावल यांचा अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा झाली. मुख्याधिकारी डॉ प्रावीण निकम यांनी अर्थसंकल्प बाबत माहिती दिली. यावेळी उपनगराध्यक्ष नबु पिंजारी, नगरसेवक करणसिह देशमुख, भाजप शहर प्रवीण महाजन, भाजप शहर माजी अध्यक्ष संजय तावडे, माजी शिक्षण सभापती राजेश जाधव सोनवणे , नगरसेवक चिरंजीवी चौधरी, ,स्वीय सहाय्यक नरेंद्र राजपूत, खलील बागवान,युसूफ कादियानी व इतर नगरसेवक उपस्थित होते.

महसुली जमेत विविध करातून 8 कोटी 79 लाख 91 हजार 954 रु, इमारती व जागा भाडे 1 कोटी 33 लाख 35 हजार , फी व आकार 82 लाख 68 हजार, शासनाकडून मिळणारे अनुदान 18 कोटी 72 लाख 51 हजार, इतर उत्पन्नातून 51 लाख 30 हजार असे एकूण महसुली उत्पन्नातून 30 कोटी 19 लाख 7 5 हजार 954 रु येणे अपेक्षित आहे.

भांडवली जमेतून (उत्त्पन्न) 1 अब्ज 28 कोटी 21 लाख 44 हजार 800 रुपये येणे अपेक्षित आहे. महसुली जमा,भांडवली जमा,आरंभीची शिल्लक 81 कोटी 79 लाख 14 हजार 392 असे एकूण 267 कोटी 15 लाख 67 हजार 591 रुपये अशी जमा बाजू दाखवली आहे. 267 कोटी 12 लाख 91 हजार 817 रु खर्च अपेक्षित आहे.

अर्थसंकल्पात पायाभूत सुविधांची कामे व इतर विकास कामाची तरतूद केली आहे.त्यात अमरावती नदी संवर्धन करीता 5 कोटी , भुयारी गटार साठी 5 कोटी , प्रशासकीय इमारत साठी 2 कोटी ,सिमेंट रस्ते 1 कोटी , डांबरी रस्ते 3 कोटी 50 लाख ,जमिनी खरेदी करणे 4 कोटी, पंतप्रधान आवास योजना 10 कोटी, नवीन उद्यान निर्मितीसाठी 70 लाख,घनकचरा प्रकल्पसाठी 1 कोटी,भुयारी गटारसाठी 5 कोटी,स्पोर्ट कॉम्प्लेक्स 33 कोटी 50 लाख ,पूल व उड्डानपुलसाठी 5 कोटी, पाणीपुरवठा खर्च 27 कोटी, रमाई आवाससाठी 2 कोटी खर्च होणार आहे. विकास कामावरील खर्च 2 अब्ज 25 कोटी23 लाख 42 हजार 445 रुपये आहे.

न. पा. महसुली खर्चावर 40 कोटी 69 लाख 42 हजार 180 , अपंग कल्याण 30 लाख 1 हजार 798, दूर्बल घटक कल्याण 30 लाख 1 हजार 798,महिला बालकल्याण व क्रीडा क्षेत्रासाठी प्रत्येकी 30 लाख 1 हजार 798 असा महसुली खर्च 41 कोटी 89 लाख 49 हजार 372 महसुली खर्च अपेक्षित आहे. व भांडवली खर्चावर 1 अब्ज 93 कोटी 24 लाख 50 हजार रु खर्च अपेक्षित आहे.

अखेची शिल्लक 2 लाख 75 हजार 774 असून 2 अब्ज 67 कोटी रु 12 लाख 91 हजार 817 खर्चाचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले.