धुळे : शिरपूर तालुका पाचशेच्या उंबरठ्यावर
धुळे

धुळे : शिरपूर तालुका पाचशेच्या उंबरठ्यावर

जिल्ह्यात दिवसभरात आढळले 17 रूग्ण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule

जिल्ह्यात आज दिवसभरात 17 पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. त्यात धुळे शहरातील 13 व मुकटीतील चार रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्याची कोरोना बाधितांची एकुण संख्या 1 हजार 393 वर पोहोचली आहे. तर शिरपूर तालुक्यात आज सायंकाळपर्यंत जरी रूग्ण आढळून आलेले नसले तरी तालुका पाचशेच्या उंबरठ्यावर येवून पोहोचला आहे.

जिल्हा रूग्णालयातील दुपारी 92 अहवालांपैकी 17 अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात धुळे शहरातील प्रोफेसर कॉलनीतील 2, सुभाष नगर 2, सोन्या मारुती कॉलनी 2, प्रमोद नगर 1, आदर्श नगर 2, वाखारकर नगर 2, महसूल कॉलनी 1, मुकटी (ता. धुळे) 4 व बहादरपूरमधील एका रूग्णाचा समावेश आहे. जिल्हाची एकूण रूग्ण संख्या 1 हजार 393 झाली आहे. त्यापैकी तब्बल 880 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत एकुण 68 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

दरम्यान शिरपूर तालुक्यातच सर्वाधिक रूग्ण आढळून येत आहे. आज सायंकाळपर्यंत नवीन रूग्ण आढळून आले नाही. मात्र काल 38 रूग्ण आढळून आले होते. त्यामुळे शिरपूर तालुक्यातील रूग्ण संख्या 488 वर पोहोचली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com