जिल्ह्यात नवीन 166 पॉझिटिव्ह रूग्ण
धुळे

जिल्ह्यात नवीन 166 पॉझिटिव्ह रूग्ण

रूग्ण संख्या 4 हजार 786 वर ; 3 हजार 221 रूग्ण करोना मुक्त

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

जिल्ह्यात आज दिवसभरात 166 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले. तर चार कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्याची एकुण रूग्ण संख्या धुळे जिल्ह्याची रूग्ण संख्या 4 हजार 786 वर पोहोचली आहे. दरम्यान रूग्ण संख्या वाढत असली तरी रूग बरे होण्याचे प्रमाणही चांगला आहे. दररोज शंभरावर रूग्ण बरे होत आहेत. आतापर्यंत तब्बल 3 हजार 221 रूग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना शिरपूरातील 80 वर्षीय वृध्द, इंदिरा नगर, धुळ येथील 68 वर्षीय पुरूष, धुळ्यातील नकाणे रोड परिसरातील 77 वर्षीय वृध्द व बोरीस (ता.धुळे) येथील 78 वर्षीय वृध्दाचा आज कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 150 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालय दोंडाईचा येथील 25 अहवालांपैकी 9 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. त्यात अष्टाणे 1, जैन कॉलनी दोंडाईचा 1, रोहणे 1, कार्ले 1, मालूनगर दोंडाईचा 1, कामपूर 1, आनंद नगर दोंडाईचा 1, धमाणेतील दोन रूग्ण आहेत.

उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील 51 अहवालांपैकी 22 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात विद्याविहार कॉलनी 1, ताजपुरी 1, दादोसिंग कॉलनी 1, मांजरोद 2, करवंद 3, तर्‍हाड कसबे 2, आदर्श कॉलनी 1, मराठा गल्ली 2, पित्तरेश्वर कॉलनी 2, गणेश कॉलनी 1, शिरपूरातील इतर 6 जणांचा समावेश आहे.

महानगरपालिका पॉलिकेक्निक सीसीसीमधील 99 अहवालांपैकी 37 अहवाल पॉजिटिव्ह आले आहे. त्यात न्हावी कॉलनी 1, रासकर नगर 2, कुमार नगर 2, देविदास कॉलनी 1, सुभाष नगर 1, आंबेडकर स्कूल 1, राजाराम नगर 1, पाटीलवाडा 1, सुयोग नगर 1, पाडवी सोसायटी 1, जुने धुळे 2, गल्ली नं. 13 मध्ये 1, विठ्ठल नगर 2, सुपडू आप्पा कॉलनी 1, आदर्श कॉलनी 1, वलवाडी शिवार 1, मनोहर थिएटर मागे 1, गुरुकृपा नगर 2, एकता नगर 1, चंदन नगर 1, गणेश कॉलनी 1, वाडीभोकर रोड 1, मोहाडी 1, वाडेकर चाळ 1, दत्तमंदिर 1, चितोड रोड 1, भोई सोसायटी 1, अरुणकुमार वैद्य नगर 1, अध्यानकार नगर 1, नकाणे रोड 2, व्हीडब्ल्लुएस कॉलेज येथील एक रूग्ण आहे.

खाजगी लॅबमधील 50 अहवालापैकी 20 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात फागणे 1, शिंदखेडा 1, स्वामी विवेकानंद कॉलनी 1, जयहिंद कॉलनी 1, कुमार नगर 1, बाहुबली नगर 1, मोहाडी 1, आग्रा रोड 1, गल्ली नं. 4 मध्ये 1, शुभम नगर वलवाडी 2, स्वराज नगर 1, धुळे/साक्री 1, रामनगर पिंपळनेर 1, शिरुड ग्रामपंचायत जवळ 1, निमगूळ 1, शिवाजी चौक जैताणे 1, विंचुर 1, साक्री 1, नगाव/मेहेरगाव येथील एक रूग्ण आहे.

जिल्हा रुग्णालयातील 109 अहवालांपैकी 22 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यात पंढरीनाथ नगर 1, कुमार नगर 1, शेलारवाडी 1, साक्री रोड 1, विष्णू नगर 1, ओम शांती अपार्टमेंट 1, पोलिस हेड क्वार्टर 1, नवजीवन नगर 1, संजयभाऊ नगर 2, जुने धुळे 1, आधार नगर 1, कुसुंबा 1, साक्री 2, ढंढाने 1, नेर 3, मुकटी 1, निजामपूरतील एका रूग्णाचा समावेश आहे.

उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील 62 अहवालांपैकी 36 अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. बंसीलाल नगर 1, तर्‍हाड़ी 3, दूध डेरी कॉलनी 1, मारवाड़ी गल्ली 1, बोराड़ी 1, शिरपुर 1, विद्या विहार कॉलनी 1, मारवाड़ी गल्ली 1, वरवाड़े 1, मार्केट रोड 3, रसिकलाल नगर 1, सदाशिव नगर 1, अर्थे 2, नाथनगरी 1, गणेश कॉलनी 1, थाळनेर 1, सांगवी 1, एके नगर 1, मांडळ 2, पितरेश्वर कॉलनी 1, भोरटेक 2, रामसिंग नगर 2, वकील कॉलनी 2, गुरुदत्त कॉलनीत चार रूग्ण आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 31 अहवालांपैकी 18 अहवाल धुळे जिल्ह्यातील पॉझिटिव्ह आले आहे. कुमार नगर 1, जिरेकर नगर 1, जीएमसी 2, चितोड रोड 1, शिरपूर 2, देवपूर 1, शर्मा नगर 1, सोनगीर 1, चितोड 2, साक्रीतील दोन रूग्णांचा समावेश आहे. जिल्हाची एकूण रूग्ण संख्या 4 हजार 786 एवढी झाली आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com