घर जाळपोळप्रकरणी 15 जणांवर गुन्हा
धुळे

घर जाळपोळप्रकरणी 15 जणांवर गुन्हा

मोहाडीतील राहुल मिंड खूनप्रकरण

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

धुळे - Dhule - प्रतिनिधी :

शहरातील मोहाडी उपनगरातील राहुल मिंड या तरुणाच्या खुन प्रकरणातील संशयीत आरोपीचे काल घर जाळून टाकल्याची घटना काल दुपारी घडली होती. याप्रकरणी रात्री उशिरा 15 जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे.

याबाबत संशयीत आरोपी चॅम्पियनसिंग भादा याची काकू गिताकौर किस्मतसिंग भादा (रा.तिखी रोड, बंद साबुण कारखान्याच्या मागे, मोहाडी उपनगर, धुळे) या महिलेने मोहाडी पेालिसात फिर्याद दिली आहे.

त्यानुसार काल दि. 27 रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास राहुल मिंड याच्या खुनाच्या कारणावरून मयुर आटोळे यांच्यासह 14 ते 15 जणांनी हातात काठया लाठ्या घेवून मिलनसिंग भादा याच्या घरात अनधिकृतपणे प्रवेश करुन घराला आग लावून दिली. त्याच्या कुटूंबाला जिवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच गिताकौर भादा हिच्यासह तिच्या नातेवाईकांच्या घरातील फ्रिज, टीव्ही, कपाट, पंखा, मिटर, पलंग अशा सामानाची तोडफोड करुन नुकसान केले. तसेच शिवीगाळ करीत पळून गेले.

याप्रकरणी मयुर आटोळे, भैय्या मिंड, बन्सी गोसावी, सागर धुमाळ, ललीत दारुवाला, गोपाल पानगे, रविंद्र चव्हाण उर्फ अण्णा, निलेश जगताप, राहुल कुवर, मनोज पाटील, बाबा गोसावी सर्व रा. मोहाडी उपनगर व इतर 3 ते 4 अनोळखी यांच्या विरुध्द भादवि कलम 307, 436, 452, 143 सह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी मयुर आटोळे, भैय्या मिंड, बन्सी गोसावी व सागर घुमाळ यांना अटक केली आहे. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.

Deshdoot
www.deshdoot.com