कनसाई शिवारातून 130 किलो गांजा जप्त

पावणे दोन लाखांचा मुद्देमाल ताब्यात, एकाविरुध्द गुन्हा
Crime
Crimeफायनान्स कंपन्यांविरुद्ध कारवाई करा

धुळे । प्रतिनिधी Dhule

शिरपूर तालुक्यातील कनसाई शिवारातील शेतात लावण्यात आलेला 130 किलो वजनाची गांज्याची झाडे जप्त करण्यात आली. या गांजाच्या झाडांची किंमत दोन लाख 60 हजार रुपये इतकी आहे. या प्रकरणी एका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कनसाई शिवारात दलसिंग फत्त्या पावरा याच्या शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती शिरपूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने छापा टाकला. त्यावेळी शेतात तीन ते आठ फुट उंचीची गांजाची झाडे आढळून आली. पोलिसांनी 130 किलो गांजा जप्त केला. या ठिकाणाहून दोन लाख सात हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी पोकॉ योगेश मोरे यांनी फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरुन देवीलाल उर्फ देवीदास दलसिंग पावरा याच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com