तीन चोरट्यांकडून 13 मोटार सायकली जप्त

तीन चोरट्यांकडून 13 मोटार सायकली जप्त

साक्री पोलीसांची कामगीरी, साडेचार लाखांचा ऐवज ताब्यात, तिघा चोरट्यांनाही अटक

धुळे Dhule। प्रतिनिधी

साक्री शहरासह परिसरातून लंपास केलेल्या 13 मोटार सायकली जप्त (Motorcycle confiscated) करण्यात आल्या आहेत. साक्री पोलिसांनी (Sakri police) ही कामगीरी केली असून तीन चोरट्यांना अटक (Thieves arrested) केली आहे.

मुकुंदनगर, साक्री व अंबापुर रोड, साक्री, ता.साक्री येथुन अनुक्रमे हीरोहोंडा कंपनीची फॅशन प्रो व स्प्लेंडर प्लस असे वाहन चोरी गेल्याची फिर्याद दाखल झाली. याची रितसर नोंद झाल्यानंतर तपासचक्रे सुरु करण्यात आले. साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या गोपीनिय माहितीनुसार वाहने चोरी करणारे संशयित भावेश यशवंत हीरे रा.गणेशपुर, ज्ञानेश्वर गोरख सोनवणे रा.साक्री व राहुल उर्फ पप्पु रमेश भावसार रा.भाडणे ता.साक्री यांचेबाबत माहीती मिळाल्याने सापळा रचण्यात आला. भावेश हिरे व ज्ञानेश्वर सोनवणे यांच्या ताब्यातून चोरी गेलेले स्प्लेंडर प्लस हे वाहन जप्त करण्यात आले. तसेच राहुल उर्फ पप्पु भावसार यालाही घरी जावून ताब्यात घेण्यात आले. त्याची विचारपुस केली असता, त्याचे ताब्यातून देखील वाहन जप्त करण्यात आले. त्यांना पोलीसी खाक्या दाखविला असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल करुन साक्री शहर व कॉलनी परीसरातुन यापुर्वी चोरी केलेल्या 11 मोटारसायकल काढुन दिल्याने त्या जप्त करण्यात आल्या. या कारवाईत सुमारे साडेचार लाख किंमतीच्या 13 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

सदर कामगिरी साक्री पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांचेसह पोसई बी. बी. नन्हे, पोसई आर.व्ही.निकम, पोहेकॉ रायते, पोकॉ सुनिल अहीरे, पोकॉ चेतन गोसावी, पोकॉ तुषार जाधव यांनी केली. तिघा चोरट्यांनाही अटक केली आहे. पोलीस अधिक्षक चिन्मय पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप मैराळे यांचे मार्गदर्शखाली करण्यात आली. साक्री व परीसरातील नागरीकांची वाहने चोरीस गेली असल्यास त्यांनी पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.

Related Stories

No stories found.