कर्ज नियमावली होणार सुटसुटीत

0

बँकांना व्याजदराचे फलक लावावे लागणार

मुंबई- बँकांकडून कर्ज घेताना अनेकदा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते आणि ग्राहकांचा वेळ वाया जातो. ही प्रणाली पारदर्शक आणि अधिक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आरबीआयकडून नवीन नियमावली तयार करण्यात येत आहे. बँकांनी एमसीएलआर प्रणालीमध्ये कर्जाचा दर निश्चित करावा यामुळे पारदर्शकता येण्यास मदत होईल.

यासाठी आरबीआयने समिती स्थापन केली होती. लवकरच याच्या शिफारसी लागू होतील. यामध्ये बँकांना आपल्या वेबसाईट आणि सर्व शाखांमध्ये व्याजदराचे फलक लावावे लागतील. प्रत्येक कर्ज क्षेत्रानुसार दाखविण्यात यावे. बँकांना जुन्या ग्रहकांसाठी बेस रेटने कर्ज देण्यात आले आहे, त्याच्यावर कोणतेही शुल्क न घेता एमसीएलआर प्रणालीमध्ये बदलण्याचा पर्याय असेल.

याव्यतिरिक्त इंडियन बँक्स असोसिएशनकडून जारी करण्यात आलेल्या सर्व बँकांच्या कर्ज दराची तुलना दाखविण्यात यावी. एखाद्या ग्राहकाला कर्ज दिल्यानंतर बँकांना स्पेडमध्ये बदल करण्याचा अधिकार असणार नाही. यामुळे बँकांना दर वाढवत जास्त उत्पन्न घेण्याची संधी संपुष्टात येईल.

LEAVE A REPLY

*