सफाई कामगारांसाठी कर्ज योजना लागू करा

0
नाशिक : स्वच्छ भारत अभियानात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या वाल्मिकी समाजातील कर्मचाऱ्यांना गेल्या दोन-तीन वर्षांपासून कर्ज योजनेचा लाभ मिळत नाही त्यामुळे बेरोजगारी वाढली आहे. म्हणून बंद करण्यात आलेली कर्ज योजना सुरु करण्यात यावी अशी मागणी समाजात करण्यात आली आहे.

ही योजना राज्य सरकारने पुन्हा एकदा सुरु करावी जेणेकरून समाजातील बेरोजगार नव्याने व्यवसाय करू शकतील. याबाबत मुख्यमंत्री आणि सामाजिक न्याय विभागाला अखिल भारतीय श्री वाल्मिकी नवयुवक संघ महाराष्ट् तर्फे नुकतेच निवेदन देण्यात आले आहे.

राज्यात गेल्या पंचवीस वर्षांपासून भाजपसोबत आहोत. वाल्मिकी समाजात अनेकजन सध्या बेरोजगार आहेत. त्यांना अर्थपुरवठा व्हावा जेणेकरून ते व्यवसाय सुरु करून उदार्निवाह करू शकतील.

शासनाने ही योजना लवकरात लवकर लागू करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

*