LIVE : अहमदनगर : मोहरम मिरवणुकीत अफवांवर विश्वास ठेऊ नका : प्रशासनाचे आवाहन

0

दुपारी बारा वाजता अहमदनगर शहरातील कोठला मैदान येथून मोहरम सवारी मिरवणुकीला उत्साहात प्रारंभ झाला.

या मिरवकणुकीत मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले आहेत.

कोठला मैदान येथून छोटे इमाम यांची तर मंगल गेट हवेली येथून बडे इमाम यांची सवारी निघाली़.

मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

कोठला मैदान ते मंगलगेट, जुनी महापालिका, कोर्टगल्ली, दिल्ली गेट, बालिकाश्रम रोड या मार्गाने ही सवारी मिरवणूक जाणार आहे.

रात्री २ वाजेपर्यंत मिरवणूक मार्गावर सवारी खेळविली जाते़. रात्री उशीरा सवारींचे विसर्जन होणार आहे. मिरवणूक मार्गवर पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत.

LIVE UPDATE : 

मोठा इमाम येथे अफवा पसरल्याने नागरिकांची धावपळ झाली.मात्र आता मिरवणूक पुर्ववत होऊन सुरु आहे.

कोणत्याही अफवांवर विशास ठेवू नये , असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.   

LEAVE A REPLY

*