Photogallery : राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विमानतळाचे उद्धघाटन

0

शिर्डी विमानतळाचं आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते लोकार्पणहोणार आहे.

मुंबई ते शिर्डी हा प्रवास आता 35 मिनिटांत पार करता येणार आहे.

त्यामुळे शिर्डीत आज कडेकोठ बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरुवातीला शिर्डी ते मुंबईबरोबरच दिल्ली, भोपाळ अशा अनेक शहरांपर्यंत विमानसेवा नियोजित होत्या. मात्र तूर्तास शिर्डी-मुंबई सेवा सुरु करुन इतर सेवा विचाराधीन आहेत.

सकाळी 9 ते 11 या वेळेत भाविकांना साईंचं दर्शन घेता येणार नाही. दोन तास मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतला.

LIVE UPADTE : 

10.25 ला राष्ट्रपतींचे शिर्डी कड़े प्रयाण; राष्ट्रपती, राज्यपाल व मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शिर्डीत साईशताब्दी महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. 

राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांच्या हस्ते विमानतळाचे उद्धघाटन झाले.

यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू हे उपस्थित होते. 

साईबाबा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे माजी मंञी,राहुरी तालुक्याचे आमदार शिवाजीराव कर्डिले, जिल्ह्याचे पालकमंञी राम शिंदे, आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हाधिकारी महाजन, पोलीस अधिक्षक शर्मा आदींनी राज्याचे मुख्यमंञी देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत केले.

काकडीत कडेकोट पोलीस बंदोबस्त

थोड्याच वेळेत राष्ट्रपति विमानतळावर पोहोचणार

 

LEAVE A REPLY

*