Photogallery : मिनी आमदारकी : कोंढवड येथे निवडणूक आधिकाऱ्याने स्वत: मत टाकल्याने गोंधळ

0

अहमदनगर : जिल्ह्यातील 195 ठिकाणी ‘गावचा आमदार’ निवडण्यासाठी आज शनिवारी 4 लाख 44 हजार 980 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळी 7.30 वाजता मतदानाला सुरवात झाली असून सायंकाळी 5.30 पर्यंत मतदान प्रक्रिया होणार असून यात निवडणूक लढवणार्‍या उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बंद होणार आहे. मतदार कुणाच्या बाजूने कौल देतात याबाबत उत्सुकता असून यात कोणी बाजी मारली याचा फैसला सोमवारी म्हणजेच 9 तारखेला होणार आहे.

LIVE UPDATE : 

कोंढवड : निवडणूक निर्णय आधिकाऱ्याने स्वत: मत टाकल्याने मोठा गोंधळ उडाला.

आरडगांव मानोरी : आत्तापर्यंत 55% शांततेत मतदान;  मतदारांमध्ये उस्फुर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे, सायं . चार वाजेपर्यंत मतदान 80% होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मांजरी : 12 वाजेपर्यत  55% शांततेत मतदान, मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग बघयला मिळत असून, अनपेक्षित निकाल लागणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे. यंदा महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळत आहे.

आरडगांव व मानोरी : 12 वाजेपर्यंत 35% शांततेत मतदान

नगर तालुक्यातील नागरदेवळे : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदारांनी मतदानासाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या तर तहसीलदार सुधीर पाटील यांनी मदतदान केंदास भेट देऊन येथील सुरक्षेविषयी पोलीस उपाधीक्षक डॉ. अक्षय
शिंदे यांच्याशी चर्चा केली तर अनेक ठिकाणी वृद्ध,अपंग,यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला

कोंढवड  : येथे 11 वाजेपर्यंत 34 टक्के मतदान

जोर्वे  : आ. बाळासाहेब थोरात व सौ कांचनताई थोरात यांनी केले मतदान

काष्टी :  मतदान यंत्राची पूजा करुन सकाळी मतदानाला सुरुवात; माजी मंत्री बबनराव पाचपुते आणि त्यांच्या पत्नी माजी जिल्हा पारिषद् सदस्य डॉ. प्रतिभा पाचपुते, मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांच्यासह कुटुंबीयानी काष्टी येथे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान केले.

LEAVE A REPLY

*