LIVE : मुंबई : मराठा क्रांती मोर्चा : मोर्चेकरी क्रांतीची मशाल पेटवून आझाद मैदानाकडे रवाना

0

ठाणे : मोर्चाच्या गर्दीने पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतुकीची कोंडी, आनंदनगर जकातनाक्यापासून मुंबईकडे येणारी वाहतूक अत्यंत धीम्यागतीने, तीनहात नाका, कॅडबरी जंक्शनपासून मुलुंड टोलनाक्यापर्यंत वाहनं खोळंबली आहेत

मुंबईकडे येणाऱ्या सर्व हायवेवरील टोलनाक्यांवर टोलवसुली बंद आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहनांची गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. मुंबईकडे येणाऱ्या नाशिक-मुंबई हायवेवरील पडघा, पूर्व द्रुतगती मार्गावरील मुलुंड टोलनाका, मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील आणि जुन्या हावेवरील सर्व टोलनाके, पश्चिम द्रुतगती मार्गावरील दहिसर टोलनाका, वाशी आणि ऐरोली टोलनाका इथे टोलवसुली बंद आहे.

LIVE :

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त मराठा मोर्चातील मोर्चेकरी क्रांतीची मशाल पेटवून आझाद मैदानाकडे रवाना

कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका; रेल्वे प्रशासन

ठाणे रेल्वे स्थानकाबाहेर कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे.

 

LEAVE A REPLY

*