LIVE : गावचा आमदार : अकोलेत 7 ग्रामपंचायती राष्ट्रवादी तर 4 सेना-भाजपाच्या ताब्यात

0

अहमदनगर : जिल्ह्यातील 195 ठिकाणी गावचा आमदाराच्या थेट जनतेतून निवडी पार पडल्या. शनिवारी मतदानानंतर आज सोमवार (दि.9) रोजी दुपारपर्यंत सर्व ग्रामपंचायतींचे निकाल लागले. निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवारांनी जल्लोष करत आनंदोत्सव साजरे केले. यात राजकीय पक्षांच्या चिन्हांना पहिल्यांदाच बंदी होती. परंतु सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आपल्याच पक्षाचा सरपंच झाल्याचे दावे केले. त्यात अनेक ठिकाणी मतदानाच्या अंतिम टप्प्यात बंडखोरी उफाळून इतर पक्षात जाहिर प्रवेश करून पाठिंबा दर्शविले.
पहिल्यांदाच थेट जनतेतून सरपंचपदाची निवड होणार असल्याने नवीन गावचा आमदाराबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली होती.

राज्यात सरपंचपदासाठी 637 व सदस्यपदासाठी 3 हजार 550 असे एकूण 4 हजार 187 उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी जीवाचे रान केले. आज त्याचा निकाल लागला.

LIVE UPADTE :
अकोले ब्रेकिंग-
अकोले तालुक्यातील ११ ग्रामपंचायत पैकी सरपंचपदाच्या निवडणुकीत सात ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार तर चार ग्रामपंचायतवर सेना भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.

पाथर्डी_तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुक सरपंच निवडणुक 2017
1)कोळसांगवी – वसंत पेटारे
2) मोहरी – कल्पजीत डोईफोडे
3)जिरेवाडी – उमाजी पवार
4)वैजूबाभूळगाव -उज्वला गुंजाळ
5)कोल्हार – शोभा पालवे
6)सोनोशी- विष्णू दौंड
7) वडगांव -रंजणा धनवे
8)कोरडगांव-विष्णु देशमुख
9)भालगांव-मनोरमा खेडकर
10)तिसगांव -काशिनाथ पाटील लवांडे
11)निवडुंगे -शोभा कोलते

पारनेर – जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींमध्ये पराभूत झाले सरपंच.

ढवळपुरी जिल्हा परिषद गटातून पराभूत झालेल्या लिलाबाई रोहोकले भाळवणीच्या सरपंचपदी विराजमान…

भाळवणी गणातून पंचायत समिती पदाचे पराभूत उमेदवार सुमन बाबासाहेब तांबे गोरेगावच्या सरपंचपदी विजयी

ढवळपुरी पंचायत समिती गणातून पराभूत राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. राजेश भनगडे ऐनवेळी सेनेत दाखल होवून झाले ढवळपुरीचे सरपंच.

कोपरगाव : 26 ग्रामपंचायत निवडणूक निकाल
कोल्हे गट – 13
काळे गट- 8
परजणे गट- 1
शिवसेना – 1
अपक्ष- 2
आघाडी- 1
एकुण- 26 ग्रामपंचायत
काळे यांच्या माहेगाव देशमुख गावात कोल्हे गटाचे बाळासाहेब पानगव्हाणे सरपंच

पारनेर तालुका १६ ग्रामपंचायत निवडणूक निकाल : 

शिवसेना : भाळवणी, गोरेगाव, ढवळपुरी (काँग्रेस युती),पळशी,वनकुटे,पाडळी तर्फे कान्हुर,गुणोरे,सिद्धेश्वरवाडी,म्हस्केवाडी

राष्ट्रवादी- : पुणेवाडी,चोंभूत,हत्तलखिंडी,पिंपळगाव तुर्क

काँग्रेस : भोंद्रे, करंदी

सोनगांव (ता. राहुरी) : ग्रामपंचायत विखे गटाकडे, जनसेवा विकास आघाडीला सरपंचपदासहित ११ पैकी ७ जागा

जामखेड : तीन ग्रामपंचायतीवर भाजपाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पालकमंत्री प्रा राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपाचे राजुरी ग्रामपंचायतीचे गणेश कोल्हे, रत्नापूर ग्रामपंचायत दादासाहेब वारे व शिऊर ग्रामपंचायतीच्या हणमंत उतेकर विजयी झले आहेत. तालुक्यातील राजुरी, रत्नापुर, शिऊर या तीनही ग्रामपंचायती भाजपाच्या ताब्यात गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला चांगलाच झटका बसला आहे.

मानोरी : शेख अब्बास (अपक्ष) सरपंचपदी विजयी , तर विद्यमान उपसभापतीच्या मंडळाला एकही जागा मिळवता आली नाही.

वाळकी : भाऊसाहेब बोठे यांच्या आघाडीची सत्ता आली, पण ते स्वतः पराभुत झाले आहेत, स्वाती बोठे सरपंचपदी विजयी झाल्या.

नेप्ती : अरूण होळकर गटाची बाजी
नागरदेवळा : राम पानमळकर गटाचा विजय
आठवड : माजी सभापती बाबासाहेब गुंजाळ यांचा गट सरपंचपदात पराभुत
सारोळा : बंडु कडुस गटाचा विजय

तुळापुर : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सरपंचपदासाठी सासु अणि सुन यांच्या लढतीमध्ये सुनेचा विजय झाला आहे.  ग्रामविकास आघाडीला ६ जागा व सरपंचपदासहित विजय.

कोंढवड : उत्तमराव म्हसे यांच्या मंडळाला सरपंचासह 9 पैकी 8 जागा

खडांबे खुद्र : ग्रामविकासला सत्ता

पाथर्डी : वैजू बाभूळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदाच्या निवडणुकीत उज्वला साहेबराव गुंजाळ विजयी झाल्या.

ताहाराबाद : कर्डिले गटाच्या सुनीता झावरे सरपंच , तनपुरे गटाला 11 पैकी 3 जागा

मांजरी : जन ग्रामविकास मंडळाने सरपंचपदासहित सर्व जागांवर विजय मिळवत विरोधकांचा धुव्वा उडविला.

श्रीगोंदा : मतमोजणीला सुरुवात,  दहा पैकी आठ गावांची मतमोजणी पूर्ण
काष्टी : सरपंच पाचपुते गट
बेलवंडी: सरपंच पाचपुते गट
घोगरगाव : सरपंच जगताप गट
चवरसांगवी : जगताप गट
तरड़गव्हाण: जगताप गट
थिटे सांगवी : जगताप गट
बनपिप्री : आ. अरुण काका जगताप
तांदळी दुमाला : जगताप गट
पारगाव सुद्रिक: नागवडे जगताप गट
माठ : पाचपुते , नागवडे गट

कर्जत तालुक्यातील सरपंच पदाचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे(कंसात पडलेली मते):-
1)बहिरोबावाडी-विजय पोपट तोरडमल-1147
2)निंबे- रामचंद्र तुकाराम खामगळ-309
3)कापरेवाडी-प्रमिला संतोष खळगे-910
4)मुळेवाडी-बबन बाबासाहेब मुळे-565
5)कौड़ाने- वैशाली दिपक जगधने -434
6)अळसुंदे- एकनाथ पांडुरंग वाघमारे-1286
7)मालंगी- मंदाकिनी महेश जगताप-907
8)कोपर्डी-रोहिणी सूर्यभान सुद्रिक-780

LEAVE A REPLY

*