Type to search

Breaking News Featured देश विदेश मुख्य बातम्या

Video : भारताचे चांद्रयान 2 झेपावले

Share

चेन्नई : वृत्तसंस्था

जगभरात संशोधनातून नावलौकिक प्राप्त केलेला भारत देश अंतराळ क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.

आज दुपारी पावणे तीन वाजेच्या  सुमारास भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) महत्त्वाकांक्षी ‘मिशन चांद्रयान-२’ चे प्रक्षेपण यशस्वीरित्या पार पडले.

१५ जुलै या दिवशी प्रक्षेपणापूर्वी क्रायोजनिक इंजिनात गळती झाल्याचा संशय आल्यामुळे शास्त्रज्ञांनी या मोहिमेला स्थगिती दिली होती. त्यानंतर बिघाड दूर करून हे प्रक्षेपण आज दुपारी नव्याने या मोहिमेचा श्रीगणेशा झाला.

असे आहे चांद्रयान

  • चांद्रयानाचे ऑर्बिटर, लँडर आणि सहाचाकी रोव्हर असे तीन भाग आहेत.
  • लँडरचं नाव ‘विक्रम’ असे ठेवण्यात आले आहे.
  • रोव्हरचे नाव ‘प्रग्यान’ असे ठेवण्यात आले असून हे सर्व भाग इस्रोने तयार केले आहेत.
  • ऑर्बिटर चंद्राभोवती फिरत राहील.

अशी आहे मोहीम 

  • चंद्रापासून 30 किलोमीटरवर गेल्यानंतर ‘चांद्रयान-2’ची गती कमी करण्यात येईल.
  • भारत पहिल्यांदाच सॉफ्ट लँडिंग करणार आहे. हे यशस्वी झाल्यास भारत जगातला चौथा देश ठरणार आहे.
  • पृथ्वी आणि चंद्रादरम्यानचे अंतर 3 लाख 84 हजार किलोमीटर इतके आहे.
  • चांद्रयान-2 द्वारे लँडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रापर्यंत जातील.
  • चंद्राच्या भूमीवर उतरण्यापूर्वी रोव्हर ‘विक्रम’ उतरण्याच्या जागेची पाहणी करणे सुरू करेल.
  • त्यानंतर लँडर यानापासून डिबूस्ट होईल. त्यानंतर विक्रम चंद्राच्या भूमीच्या अगदी जवळ पोहोचेल. जिथे उतरायचे आहे त्या जागेचे स्कॅनिंग सुरू होईल.
  • त्यानंतर 6 ते 7 सप्टेंबरदरम्यान लँडिंगची प्रक्रिया सुरू होईल.
  • लँडिंगनंतर लँडर विक्रमचा दरवाजा उघडेल. त्यानंतर रोव्हर प्रज्ञान बाहेर येईल.
  • रोव्हर बाहेर येण्यासाठी सुमारे 4 तास लागतील. त्यानंतर तो वैज्ञानिक परिक्षणांसाठी चंद्राच्या भूमीवर चालू लागेल.
  • यानंतर पुढील 15 मिनिटांच्या आत इस्रोला लँडिगचे फोटो मिळणे सुरू होईल.
  • चंद्राच्या पृष्ठभागावर हे यान उतरवून चंद्राच्या आजवर अभ्यास न झालेल्या दक्षिण ध्रुवाजवळील भागाचा अभ्यास करणे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे.

प्रक्षेपणाचा लाईव्ह व्हिडीओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!