Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

Video : गणेशोत्सवाच्या अखेरच्या दिवशी जिवंत देखाव्यांनी वेधले लक्ष…

Share

नाशिक | अश्विनी राठोड/नंदिनी खंडारे

गणेशोत्सवात वेगवेगळ्या प्रकारचे देखावे सादर करण्यात आले. यामध्ये सर्वात जास्त गर्दी जमवली ती जिवंत देखाव्यांनी. ऐतिहासिक देखावे, प्रेरणात्मक देखावे सादर करत असलेल्या देखाव्यांचीही यंदाच्या गणेशोत्सवात चर्चा होती.

जुन्या नाशिकमधील खांदवे गणपती येथील वेलकम मित्र मंडळ यांनी 2006 पासून जिवंत देखावा सादर करण्याची परंपरा जपली आहे. यावर्षीदेखील जिवंत देखाव्याच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर जनतेकडून कशाप्रकारे पैसे उकळतात.

असे या जिवंत देखाव्यातून दाखविण्यात आले आहे. देखाव्यात मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटाची थीम वापरली आहे.   या चित्रपटाच्या अनुषंगाने नाटक सादर केले.

यात त्यांनी डॉक्टर रुग्णांना कशाप्रकारे वागणूक देतात. त्यांना कशाप्रकारे लुबाडले जाते. नियमित दवाखान्यांमध्ये डॉक्टर आणि रुग्ण यांचा संघर्ष यातून दाखविण्यचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, डॉक्टर वर्गाची भावना दुखवण्याचा हेतु यातून नसल्याचे मित्र मंडळाकडून सांगण्यात आले आहे. तसेच या क्षेत्रातील सर्वच व्यक्ती भ्रष्टाचारी असतील असेही नाही, परंतु काही मंडळींनी हा भ्रष्टाचाराचा बाजार मांडला आहे म्हणून यावर गणेशोत्सवात प्रकाशझोत टाकण्यात आल्याची माहिती मंडळाचे गणेश मोरे, प्रसाद संधान, हेमंत परदेशी, सारंग खेडकर, अक्षय मोरे, श्रीकांत थोरात, मकरंद खांदवे यांनी दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!