Type to search

हिट-चाट

#LiveConcert : उद्या नाशकात गुरु रंधावा आणि दर्शन रावल यांचा लाईव्ह कॉन्सर्ट

Share

नाशिक : तरुण तरुणीचा गळ्यातला ताईत असलेला गायक गुरु रंधावा उद्या नाशकात दाखल होत असून डोंगरे वसतिगृह येथे लाईव्ह कॉन्सर्ट होत आहे. त्यामुळे तरुणांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली असून नंबर वन यारीच्या माध्यमातून नाशिकमध्ये हा कॉन्सर्ट आयोजित केला आहे.

दरम्यान नाशकातील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या डोंगरे वसतिगृह मैदानावर जोरदार तयारी झाली असून युथचा प्रचंड प्रतिसाद या कॉन्सर्टला लागणार आहे. या कॉन्सर्टसाठी मुंबई, ठाणेसह, नागपूरमधून चाहते येणार असल्याची माहिती मिळत आहे.

गुरु रंधावा व दर्शन रावल हा आघाडीच्या गायकांपैकी एक आहेत. त्यांच्या गाण्यांनी तरुणांना भूरळ घातली आहे. सध्या गुरु रंधावा हा सगळ्यात जास्त चर्चेत असलेला गायक आहे. जगभरात त्याचे फॅन्स आहेत. रंधावा आता फक्त पंजाबी गाण्यांपूरताच मर्यादित राहिलेला नाही. बॉलिवूडमध्ये देखील त्याने आपली जादू कायम ठेवली आहे.

Tags:

Leave a Comment

error: Content is protected !!