LIVE : शीतल सांगळे व नयना गावित यांच्या निवडीसाठी सेनेकडून व्हीप जारी

0

नाशिक : नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उमेदवारांची बस नुकतीच जिल्हा परिषद आवारात आली. सर्व उमेदवारांनी भगवे फेटे परिधान केले आहेत.

आमदार अनिल कदम यांनी उमेदवारांना पक्षादेश (व्हीप)चे वाचन करून दाखवले आहे. शिवसेनेचे गटनेते धनराज महाले यांनी जारी केला आहे.

ऐनवेळी पक्षातून फुट होऊ नये म्हणून हा आदेश जारी करण्यात आला आहे. इतर पक्षाच्या उमेदवारांची जिल्हा परिषदेकडे कूच सुरु आहे.

लवकरच नाशिक जिल्हा परिषदेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीस प्रारंभ होत आहे.

LEAVE A REPLY

*