Type to search

Featured जळगाव फिचर्स

जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार

Share

जळगाव  –

कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्ह्यातील मद्य विक्रीची दुकाने 14 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत.आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व महाराष्ट्र दारुबंदी कायदा आणि 1949 चे कलम 142 (1) अन्वये जल्ह्यातील सीएल-2, सीएल-3, सीएल/एफएल/टीओडी-3, एफएल-1, एफएलएल-2, एफएलबीआर-2, टीडी-1, इत्यादी देशी/ विदेशी मद्य/बीअर/ताडी विक्री अनुज्ञप्त्या 1 एप्रिल ते 14 एप्रिल 2020 अखेर पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी निर्गमित केले आहे.

या आदेशाचे पालन न करणार्‍या कोणत्याही व्यक्तीने अथवा संस्थेने भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188 अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल.

त्याचप्रमाणे अशा व्यक्ती किंवा संस्था महाराष्ट्र दारुबंदी कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईस पात्र असतील.

या आदेशाचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास अनुज्ञप्ती तत्काळ रद्द करण्यात येईल. असेही डॉ. ढाकणे यांनी आदेशात म्हटले आहे.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!