पिंपळगाव बसवंतला मद्यसाठा जप्त

0
नाशिक | पिंपळगाव बसवंत येथील मुंबई आग्रा महामार्गावर हाॅटेल गोदावरी मध्ये अवैध मद्यसाठा जप्त   करण्यात आला आहे.

पोलीस अधीक्षक संजय दराडे याच्या विशेष पथकाने पिंपळगाव बसवंत जवळ गोदावरी हॉटेल येथे छापा टाकून देशी विदेशी मद्याच्या 227 बाटल्या हस्तगत केल्या.

पंचवीस हजार रूपयांचा माल जप्त केला. पो.नि.जालींदर पळे यांच्यासह कैलास शिरसाठ, संकेत कासार, निवृत्ती काळे, प्रदीप खांडेकर, नितीन महिरे, अमोल दर्वे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

पाच वाजेच्या सुमारास कारवाई करून नागेश कृष्ण याच्यावर पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

*