Wednesday, April 24, 2024
Homeनाशिक55 हजार शेतकर्‍यांचा डाटा आधार कार्डशी लिंक

55 हजार शेतकर्‍यांचा डाटा आधार कार्डशी लिंक

‘पीएम’ किसान सन्मान योजना : पावणेदोन लाख जोडणी बाकी

नाशिक । प्रतिनिधी

- Advertisement -

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत नाशिक जिल्ह्यात तीन लाख लाभार्थी शेतकर्‍यांपैकी 55 हजर शेतकर्‍यांचा डाटा आधार कॉर्डशी लिंक करण्यात आला आहे. अद्याप 1 लाख 73 हजार लाभार्थी आधारलिंक करणे शिल्लक असून जिल्हा प्रशासनाकडून युध्दपातळीवर प्रयत्न सुरु आहे. आधार लिंक नसल्यास पीएम किसान योजनेचा तिसरा हप्ता मिळणार नाही.

लोकसभा निवडणुकीपुर्वी केंद्रातील भाजप सरकारने शेतकर्‍यासाठी पीएम किसान योजना सुरु केली. अल्प भू धारकांना ही मदत मिळणार होती. लोकसभा निवडणुकीत पुन्हा भाजप सत्तेत आल्यावर शेतकर्‍यासाठी सरसकट ही योजना लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत 1 ऑगस्ट 2019 पासून डाटा आधारलिंक असलेल्य पात्र लाभार्थ्यांना अनुदान दिले जाणार होते. या नवीन अटीमुळे राज्यात लाखो शेतकरी योजनेच्या अनुदानापासू वंचित राहण्याची शक्यता होती.

त्यामुळे केंद्र शासनाने सदरची बंधनकारक अट लाभार्थ्यांचा डाटा आधारलिंक करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2019 पर्यंतच शिथील केली. पण या मुदतीत जिल्ह्यातील केवळ 55 हजार लाभार्थ्याचेच आधारलिंक झाले. आजही 1 लाख 73 हजार शेतकरी आधारलिंक विना आहेत. त्यामुळे केंद्र स्तरावरुन त्यांना मिळणारा 2 हजार रुपयांचा तिसरा हप्ता मिळुु शकलेला नाही. तर काहींना अद्याप दूसरा हप्ताही मिळालेला नाही. 1 डिसेंबर 2019 नंतर पात्र लाभार्थ्यास वितरीत करण्यात येणारे सर्व हप्ते आधारलिंक आधारितच करण्यात आले आहेत. त्या करीता पीएम किसान पोर्टलवर पात्र लाभार्थ्यांना नावे आधार प्रमाणे दुरूस्ती करण्यासाठी सुविधा देखिल उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.

या सुविधेमार्फत लाभार्थ्यांना पोर्टलवर जावून स्वत: दुरूस्ती करता येईल. तसेच संकेतस्थळावर देखिल आधारलिंक करता येणार आहे. या सुविधेमध्ये राज्यातील आपले सरकार सेवा केंद्रामार्फत आधार दुरूस्ती व इतर सर्व सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक गावातील आपले सरकार सेवा केंद्राची सुविधामार्फत मोठ्या प्रमाणावर पात्र लाभार्थी त्यांची आधारकार्ड आधारीत माहिती पी.एम. किसान योजनेच्या पोर्टलवर जात लिंक करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या