कोरोना संकटांत आयुर्वेदाचे महत्त्व

jalgaon-digital
6 Min Read

संसर्गाचा उद्रेक होत असल्याने व लस उपलब्ध नसल्याने सहाजिकच बरीच लोकं आयुर्वेदिक उपचार पध्दतीकडे वळतात. कोव्हीड-19 चा संसर्ग कमी करण्याच्या उपचार पध्दतीत सर्वात जास्त चर्चेत असलेल्या गुळवेल, तुळस व अश्वगंधा या तीन वनस्पतींच्या अर्काचा वापर व त्यावर आधारित संशोधनाचा जोर वाढला आहे. या औषधी वनस्पतींची शास्त्रीय माहिती या लेखात नमूद केली आहे.

प्रा.डॉ.पी.एस.लोहार अध्यक्ष, अभ्यास मंडळ, उमवि, जळगाव

जगभरातील प्रगत औषध निर्माण संस्था व विद्यापीठात कोरोना विषाणूविरोधात लढू शकणार्‍या 120 लसींद्वारे चाचण्या सुरू आहेत. त्यापैकी 8 लसी मानवातील रोगप्रतिकारक शक्तीत सकारात्मक बदलासाठी अग्रेसर दिसून आल्याने त्यांचे परीक्षण अंतिम टप्प्यात आहे. सर्वमान्य परिणामकारक लस उपलब्ध नसल्याने डठड-पर्उेीं2 च्या संसर्गाने होणार्‍या कोविड-19 रोगाने जगभरात महामारीचा कहर माजवला आहे.

आजपर्यंत जगात कोरोना विषाणूचा संसर्ग 1 करोड 11 लाखांपेक्षा जास्त व कोविड-19 ने मृत झालेल्यांची संख्या 5 लाख 20 हजारांपर्यंत पोहोचली. भारतात 1 जुलैपर्यंत कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 5 लाख 20 हजारांवर पोहोचली व महाराष्ट्र 1 लाख 80 हजार संख्येसह देशात आघाडीवर आहे. संसर्गाचा उद्रेक होत असल्याने व लस उपलब्ध नसल्याने सहाजिकच बरीच लोकं आयुर्वेदिक उपचार पध्दतीकडे वळतात.

आयुर्वेदाचा अर्थ दीर्घायुषी आरोग्य आणि वेद म्हणजे ज्ञान असा आहे. आयुर्वेद ही 5000 वर्षांपूर्वीपासून चालत आलेली उपचार पद्धती आहे. खरंतर ही केवळ उपचार पध्दती नसून एक जीवनशैली आहे. आयुर्वेदाची पाळंमुळं जरी भारतातील असली तरी जगभरात ह्या उपचार पध्दतीचा वापर केला जातो. आयुर्वेदात अनेक आजारांवर उपचारासाठी विविध पध्दतींचा वापर केला जातो. जसं वनौषधींचा वापर, घरगुती उपचार, आयुर्वेदीक औषधं, आहार, मालिश आणि ध्यानसाधना अशा विविध पध्दतींचा उपयोग केला जातो.

भारतीय ऋषीमुनींनी लेखन केलेले सर्वात जुने ग्रंथ म्हणजे चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांग हृदय हे आहेत. हे सर्व ग्रंथ पंचत्तत्व म्हणजे पृथ्वी, जल, वायू, अग्नी आणि आकाश यांवर आधारित आहेत. हे ग्रंथ आपल्याला निरोगी आणि आनंदी जीवनासाठी ही पाच तत्व कशी संतुलित ठेवावी, ह्याचे महत्त्व सांगतात. आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्ती कोणत्या ना कोणत्या तत्त्वाने प्रभावित होत असतो. याचे कारण असते त्याच्या प्रकृतीची संरचना व त्यानुसार यात वात, पित्त व कफ असे तीन दोष असतात. आयुर्वेदात या तिन्ही मूलतत्त्वांचे संतुलन साधून रोग बरा करण्यात भर दिला जातो.

कोविड-19 चा संसर्ग कमी करण्याच्या उपचार पध्दतीत सर्वात जास्त चर्चेत असलेल्या गुळवेल, तुळस व अश्वगंधा या तीन वनस्पतींच्या अर्काचा वापर व त्यावर आधारित संशोधनाचा जोर वाढला आहे. या औषधी वनस्पतींची शास्त्रीय माहिती या लेखात नमूद केली आहे.

गुळवेल म्हणजेच गुडुची किंवा गिलोय जिचे शास्त्रीय नाव टिनोस्पोरा कॉर्डिफोलिया (ढळपेीिेीर लेीवळषेश्रळर) असून ही वनस्पती भारत, श्रीलंका व म्यानमार या उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळते. ह्या वनस्पतीला अमृतवेल असेही म्हणतात. या वनस्पतीच्या सत्त्वाचा वापर औषध म्हणून केला जातो. ज्याला गुळवेलसत्त्व असे म्हंटले जाते. महाराष्ट्रांमध्ये गुळवेल ही वनस्पती सर्वत्र आढळते. गुळवेल एक नैसर्गिक अमृतकुंभ असा उल्लेख बर्‍याच ऋषींनी केलेला आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये आढळतो. गुळवेलाची पाने ही दिसायला खायच्या पानाच्या पानासारखीच असतात. गुळवेलाच्या पानांमध्ये कॅल्शिअम, प्रोटिन, फॉस्फरस हे घटक आढळतात आणि ह्याच्या शिरांमध्ये स्टार्चची मात्राही आढळते. कडुनिंबाच्या झाडासोबत ह्याची लागवड केल्यास ह्या वनस्पतीच्या गुणांमध्ये अधिक वाढ आढळते. गुळवेलचा अर्क शरीरातील रोगप्रतिकार क्षमता वाढवते. ज्यामुळे सर्दी, खोकला, ताप तसेच हाइपोग्लिसिमिक अर्थात साखर कमी करणारे घटक असल्याने मधुमेह या आजारांपासून संरक्षण मिळते.

तुळशीला ‘हर्ब क्वीन’ किंवा ‘औषधाची राणी’ असं संबोधलं जातं. तुळशीमध्ये (इरीळश्र) पानांमध्ये आणि फुलं म्हणजेच मंजिर्‍यांमध्ये अनेक प्रकारची रासायनिक तत्त्व आढळतात. तुळशीच्या पानांमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी आणि के, कॅल्शियम,

आर्यन, झिंक, ओमेगा- 3 फॅटी अ‍ॅसिड, मॅग्नेशिअम, मँगनीज आढळतात. तुळशीच्या पानांचा अर्क पोटाचे विकार व त्वचा रोग घालवण्यासाठी, किडनी स्टोन विरघळून मूत्रविसर्जन सुलभ होणेसाठी, सर्दी-खोकल्यावर तसेच शरीरात अँटिबॉडीजचे उत्पादनात अनेक पटीने वाढ करून रोगप्रतिकारक शक्ती वाढवणेसाठी होतो. तुळशीच्या पानांना खाण्याचा योग मार्ग म्हणजे ती पानं गिळणं किंवा त्याचा रस, काढा बनवून पिणं.

चहा किंवा इतर प्रकारे पाण्यात तुळशीची पान उकळून पिता येतात. पण चुकूनही तुळशीची पान चावू नये. याचे कारण म्हणजे तुळशीच्या पानांमध्ये पारा धातूची तत्त्व आढळतात, जी पानं चावल्याने दातांवर लागून दातांचे नुकसान होऊ शकते. तुळशीला कधीही फक्त रोपटं समजू नये, गायीला फक्त पशू समजू नये आणि गुरूला कधीही साधारण मनुष्य समजण्याची चूक करू नये, कारण हे तिघे शक्तीचे स्त्रोत आहेत.

अश्वगंधाचे वैज्ञानिक नाव विथानिया सोम्निफेरा (थळींहरपळर ीेापळषशीर) आहे व यास इंडियन जिनसेंग आणि इंंडियन विंटर चेरी असंही म्हटलं जातं. अमेरिकेच्या नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फोर्मेशन (छउइख) ने प्रकाशित केलेल्या रिपोर्टनुसार यात एल्केलॉइडस, ग्लायकोसइड्स, लोह, क्लोरोजेनिक अ‍ॅसिड इत्यादी फायटोकेमिकल्स असतात.

याचा मुळांचा अर्काचा उपयोग पुरूषांमध्ये सेक्सची क्षमता आणि प्रजनन क्षमता अधिक चांगली करण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी होतो. यामध्ये असणारे अँटिऑक्सिडंट गुण हे शरीरातील जीवरसायनिक प्रक्रियेत तयार झालेल्या फ्री- रेडिकल्सचे प्रमाण कमी करते. यामुळे अँटीएजिंग (तारुण्यता) परिणाम साधला जातो.

अश्वगंधामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी व अँटिलिपीडिमिक गुण असल्याने पेशीं समूहातील दाहकता कमी होते व त्यातील खराब कोलेस्ट्रॉल (ङऊङ) चा स्तर कमी होतो. अश्वगंधेतील बीटा-ग्लूकॅनमुळे मुख्यतः पेशींमध्ये विषाणूंच्या विरोधात लढणार्‍या इंटरलुकिन्स व इंटरफेरोन्स या सायटोकाइन्स या प्रथिनांचे प्रमाण वाढवून शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. असे वर्ल्ड जर्नल ऑफ मेडिकल सायन्सच्या शोधनिबंधात प्रसिद्ध झाले आहे व यासंदर्भात जागतिक स्तरावर 16 तर भारतात 5 पेटंटस दाखल झालेले आहेत.

वरील तिन्ही वनौषधींचा वापर करून तयार केलेल्या काढ्याबद्दल व इतर औषधी गुणधर्म असलेल्या वनस्पतींबद्दल आयुर्वेदिक डॉक्टर अर्थात वैद्य अधिक चांगले सांगू शकतात. या वनस्पतींच्या अर्काच्या मिश्रणात प्रत्येकाचे किती प्रमाण असावे व त्याचा उपयोग कसा करावा, यासंदर्भात वैद्यांच्या सल्ला घ्यावा; असे केल्याने निश्चितच कोरोना विषाणूचा संसर्ग कमी होतो, असा अनेक आयुर्वेदाचार्यांचा दावा आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *