Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

नाशिकमध्ये दोघांवर मध्यरात्री टोळक्याकडून प्राणघातक हल्ला

Share

नाशिक | प्रतिनिधी 

जुने नाशकातील तिवंधा चौकात दोघांवर चार ते पाच जणांच्या टोळक्याने चॉपर, लोखंडी गजाने हल्ला चढविला. या हल्ल्यात दोघेजन गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

विराज जगदीश जंगम (वय 23, रा. दिल्ली दरवाजा), रोहित पेखळे (वय 23, रा. तिवंधा चौक) हे दोघे रात्री जेवण करून बाहेर कट्ट्यावर गप्पा करत बसले होते.

संशयीत हल्लेखोर यश खैरे, गणेश खैरे, सौरभ मराठे, अशोक खैरे व त्यांचा एक साथीदार अशा पाच जणांच्या टोळक्याकडून जंगम व पेखळे यांच्यावर हल्ला करण्यात आला.

यावेळी परिसरात धावपळ उडाली. हल्लेखोर तात्काळ घटनस्थळावरून फरार झाले. जखमी अवस्थेत दोन्ही युवकांना परिसरातील नागरिक, नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक आयुक्त अशोक नखाते, वरील पोलिस निरीक्षक दीपक रोहकले, गुन्हे शाखेचे आनंदा वाघ, उपनिरीक्षक अनिल बागुल यांच्यासह भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी पोलीस ठाण्याचे गस्ती पथक घटनास्थळी दाखल झाले.

तात्काळ पाटील यांनी पथकाला हल्लेखोरांचा माग काढण्याचे आदेश दिले. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!