आईपासून भरकटलेल्या वासराला दिले जीवदान; मातृप्रेमाचे अनोखे दर्शन

0
नवीन नाशिक (दिलीप कोठावदे) |  गायीची व वासराची ताटातूट झाल्याने सदर गाय परिसरात आपल्या वासराचा शोध घेत हंबरत फिरत होती. सायंकाळी ही गाय वासराचा मागोवा घेत बरोबर इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळ थबकली व काही क्षणातच मंदिराच्या प्रांगणात प्रवेश करून ज्या ठिकाणी वासराला झोपवले होते त्याच ठिकाणी जाऊन घुटमळली.

तिचे हंबरणे आणि वारंवार त्या जागेचा वास घेणे बघून कार्यकर्त्यांच्या लक्षात आले व त्यांनी तात्काळ प्राणीमित्र पुरुषोत्तम आव्हाड यांना पुन्हा संपर्क साधून माहिती देत बोलावले. त्यांनी वासराला पुन्हा त्याच ठिकाणी आणले. वासरु बघताच गायीने मोठ्याने हंबरायला सुरूवात केली.

क्षणाधार्त ते वासरु देखील गायीला बिलगले व तेथेच गायीने वासराला दूध पाजले. हे अनोखे दृष्य पाहणार्‍यांच्याही डोळ्यांच्या कडा क्षणभर ओलावल्या.

मनसोक्त दुग्धपान झाल्यानंतर तरतरी आलेले ते वासरू आपल्या आईच्या पाठोपाठ मंदिराच्या प्रांगणातून स्वत:च्या पायावर चालत बाहेर पडले. या प्रसंगातून मुक्या प्राण्यांच्या मनात असलेल्या वात्सल्याचे दर्शन उपस्थितांना घडले.

त्याचवेळी येथील रायगड चौक मित्र मंडळाचे काही सदस्य इच्छापूर्ती गणेश मंदिराजवळ उभे होते. त्यांच्या लक्षात ही बाब येताच, त्यांनी तात्काळ मुर्च्छित झालेल्या वासराला उचलून मंदिराच्या प्रांगणात आणले. त्याच्या शरीरात अल्पशी धूगधूग होती. कार्यकर्त्यांनी तात्काळ त्याचे शरीर कोरडे केले व शेकोटी पेटवून उब निर्माण केली. दुसरीकडे काही कार्यकर्त्यांनी गायीचे दूध उपलब्ध करून बाटलीने त्याला दूध पाजले.

तर काहिंनी परिसरातील व्यावसायिकांकडून बारदान गोळा करून त्याच्या अंगावर पांघरली. भूक आणि थंडीने गलीतगात्र झालेल्या त्या वासराच्या शरीरात चांगली तरतरी आली. भाजपाचे कार्यकर्ते किरण शिंंदे यांनी प्राणीमित्र पुरुषोत्तम आव्हाड यांच्याशी संपर्क करून त्यांना माहिती दिली.

आव्हाड यांनी तात्काळ मंदिर प्रांगणात येऊन वासराच्या जीवाचा धोका टळल्याची खात्री केली व वासरु आपल्या ताब्यात घेतले.

जगात एकीकडे परस्परातील कटुता वाढत असताना रायगड चौक मित्र मंडळाच्या गोपी विठ्ठलकर, सुधीर भदाणे, किरण शिंदे, गणेश गवळी, बापू गवळी, सौरभ संधान, निखिल भारते, सागर चौधरी, एकनिष्ठ युवा फाऊंडेशनचे योगेश गांगुर्डे, किरण प्र. शिंदे यांनी भूतदया दाखवत गायीच्या वासराला जीवदान देण्याचे कौतुकास्पद कार्य केले आहे.

LEAVE A REPLY

*