Type to search

Breaking News Featured maharashtra मुख्य बातम्या

‘दोन दिवस थांबूया’ राज ’ईडी’ प्रकरणी सेना पक्षप्रमुखांची भुमिका

Share
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला मुंबईच्या सुरक्षेचा आढावा, Latest News CM Udhav Thakaray Taken Review Of Mumbai Safety

मुंबई | प्रतिनिधी

मनसेना अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना अप्रत्यक्ष पाठिंबा देत म्हणाले की, मला वाटत नाही ईडीच्या चौकशीतून काही निष्पन्न होईल. त्यामुळे दोन दिवस थांबुया, असे उद्धव ठाकरेंनी सांगितले.

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे राजकारणात कट्टर विरोधक असले तरी त्यांनी आपलं नाते जपल्याचे अनेक प्रसंगातून समोर आलं आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्या कठीण काळात उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच लक्ष लागले होते.

याशिवाय कोहिनूर प्रकरणात शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेष जोशी यांचेही ही नाव समोर आले आहे. त्यांचीही ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या प्रकरणात आपल्या माणसांच्या बाजूने उभे राहिल्याचे पाहायला मिळत आहे.

राज ठाकरे यांना 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोहिनूर मिल क्रमांक तीन विकत घेण्यामध्ये राज ठाकरे यांची भूमिका असून यासाठीच ते ईडीच्या रडारवर होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!