Photo Gallery : ‘नन्ही कली’ अंतर्गत ३१ शाळांतील विद्यार्थिनींना स्वयंसुरक्षिततेचे धडे

0
नाशिक : नन्ही कली उपक्रमांतर्गत नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाकडून शालेय विद्यार्थिनींसाठी कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक शहर पोलीस, शिक्षणाधिकारी, नन्ही कली प्रकल्प अधिकारी ज्योती वाघचौरे यांच्या संयुक्त विद्यमाने मनपा हद्दीतील ३१ शाळांमध्ये स्वयंसुरक्षेसाठी कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रशिक्षणात पाच black बेल्ट मिळवलेल्या पोलीस आयुक्तालयातील महिला पोलीस शिपायांनी प्रशिक्षक म्हणून काम बघितले.

कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहायक पोलीस आयुक्त सचिन गोरे, पोलीस निरीक्षक मधुकर कड, मुख्याध्यापिका सविता पाटील आदींची उपस्थिती होती.

सर्व फोटो : नाशिक पोलीस

LEAVE A REPLY

*