Type to search

Breaking News नाशिक मुख्य बातम्या

इगतपुरी तालुक्यातील ओंडली शिवारात बिबटया मृतावस्थेत आढळला

Share

घोटी : इगतपुरी तालुक्यात गेल्या आठ दिवसांपूर्वी महामार्गावर अद्यात वाहनाने धड़क दिल्याने एका बिबटयाचा मृत्यु झाल्याची घटना ताजी असतानाच आज घोटी – वैतरणा मार्गावरील ओंडली गावाजवळ जंगलात एक बिबटया मृतांवस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे .

याबाबत वृत्त असे की घोटी वैतरणा मार्गवरील ओंडली गावापासुन दीड किमी अंतरावर एका शेतक-याला बैल चरत असताना जवळच बिबटया मृतावस्थेत पडल्याचे निदर्शनास येताच त्याने ही बाब पोलिस पाटिल यांना सांगितली पोलिस पाटलांनी वनविभागाला ही माहिती दिली.

वनविभागाच्या पथकानेही घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हा मृतावस्थेत असलेला बिबट्या नर जातीचा असून तीन ते चार दिवसापासुन तो मृतावस्थेत असावा असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

या मृत बिबटयाचे शव वनविभागाने ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी घाटनदेवीच्या जंगल परिसरातही नेल्याचे समजते. उद्या बुधवारी शवविच्छेदन करण्यात येणार असून त्यानंतरच बिबटयाच्या मृत्युचे कारण स्पष्ट होणार असल्याचे सांगण्यात आले.

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!