कावनई परिसरात बिबट्याच्या मुक्त संचार

0
कावनई | इगतपुरी तालुक्यातील कावनई परिसरात गेली आठवड्यापासून बिबट्याच्या मुक्त संचारामुळे या परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

या परिसरातील पाळीव जनावरे फस्त बिबट्याने केल्याच्या घटना घडल्या आहेत. वनविभागाने बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

इगतपुरी तालुक्यातील वैतरणा रस्त्यावरील कावनई परिसरात गेली आठ दिवसापासून या भागातील नागरिकांना बिबट्याचे दर्शन होत आहे.

बिबट्या सूर्यास्त झाल्यानंतर कावनई परिसरातील रायाबे, वाघ्याची वाडी, बीटूरली  आदी परिसरात येथील ग्रामस्थांना नजरेस पडला आहे.

बिबट्याचा वन विभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

*