वेहळगांव येथे बिबट्यांची दहशत; परिसरात घबराट

0

नांदगांव । नांदगांव तालुक्यातील वेहेळगाव परिसरातील नागरीक व  शेतकरी वर्ग नरभक्षक बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असुन वन विभागाने त्वरीत त्याचा बंदोबस्त कराव अशी मागणी परीसरातील  नागरीकांनी केली आहे.

गेल्या आठवड्यात येथुन जवळच असलेल्या देशमुखवाडी शिवारात मेंढ्या चारण्यासाठी गेलेला वेहेळगाव येथील काळु सोनवणे या १३ वर्षीय मुलगा बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना घडली होती.

पुन्हा त्याच परिसरात काही अंतरावर कापुस वेचणी करणा-या महिलेवर झडप घालत बिबट्याने तिलाही ठार केले. यामुळे परिसरातील नागरीकांमध्ये भितीचे वातावरण आहे.

रब्बी हंगामाची कामे सध्या जोर धरू लागली आहेत. पिकांना पाणी भरणेसाठी रात्रीच्या वेळेस कोणीही शेतात जाण्याची हिम्मत करत नाही. तसेच शेतमजुरही कामावर येण्यास घाबरत आहेत.

परिसरातील बरेचसे लोक ऊसतोडीसाठी बाहेरगावी गेले असल्याने मजुरांची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. बिबट्याच्या दहशतीने शेतशिवार व गावात सायंकाळी अंधार पडण्याअगोदरच शांतता पसरस आहे.

वनविभागाने त्वरित पिंजरे लावुन बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

*