Type to search

Breaking News Featured maharashtra आवर्जून वाचाच नाशिक मुख्य बातम्या

पुन्हा एकदा नाशिकात ‘बिबट्या आला, रे बिबट्या आला’; अफवांनी नाशिककर चिनभिन

Share

नाशिक | प्रतिनिधी

शहर परिसरातील सावरकर नगर भागातील बिबट्याच्या पकडल्यानंतर गंगापूर भागात बिबट्याचा वावर असल्याच्या बातम्या आज खूप वेगाने नाशकात पसरल्या. मुळात बिबट्या आलाच नव्हता, कुणी एक जुना फोटो टाकून बिबट्या आल्याची भीती घातली. त्यानंतर चिनभिन झालेल्या नाशिककरांनी कुठल्याही परिस्थितीची तमा न बाळगता आणि कुठल्याही घटनेची शहनिशा न करता वेगाने सोशल मीडियात याबाबत माहिती पसरवली.

यामुळे काही ठिकाणचे रस्ते बंद असल्याचे कुणी सांगितले, तर कुणी शहरातील विस्ज्डम हायस्कूलमध्ये बिबट्या शिरल्याने शाळा प्रशासनाने शाळेच्या खोल्यांचे दरवाजे बंद करून मुलांना सुरक्षिततेसाठी कोंडून ठेवले असल्याची अफवा पसरवली. जेव्हा देशदूतच्या प्रतिनिधींनी परिसरात राहणाऱ्या रहिवाशांशी फोनवर चर्चा केली तेव्हा मात्र आमच्याकडे कुठेही बिबट्या आला नसून जनजीवन सुरळीत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

अफवा पसरविणारा प्रत्यक्षदर्शी समोर आला नाही. आजच्या घटनेने वनविभागानेही जाणत्या नाशिककरांवर नाराजी व्यक्त केली.

बिबट्याच्या वातावरणामुळे शाळा बंद केल्याच्या अफवेनेतर नागरीकांमध्ये कमालीची भीती निर्माण झाली होती. गंगापूर गाव परिसरात मोठ्या प्रमाणात बिबट्याचा वावर असल्याच्या बातम्या फोनद्वारे पसरत आहेत. दोन दिवसांपूर्वी डॉबरमॅन कुत्र्याला बिबट्याने मारल्याची घटना समोर आली होती. तसेच काही परिसरात बिबट्याचा संचार असल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यामुळे आजचा दिवस नाशिककरांनी अफवा पसरविण्यात वाया खालत अनेकांना गोंधळात टाकले.

सकाळपासून या अफवांनी कहरच केला होता. प्रत्यक्षात सोशल मिडीयातून या घटना शेअर करण्यात आल्या. प्रत्यक्षात तो फोटो विज्डम हाय शाळेचा नव्हताच सोबतच शाळेतील मुले क्रिडा स्पर्धांसाठी बसवरून  बाहेर गेल्याने शाळेच्या आवारात फारशी वर्दळच नसल्याने उगाचच खोट्या अफवांमुळे पालकांमध्ये भितीचे वातावरण पसरलेले असल्याचे लक्षात आले.

एका नगरसेवक पूत्राने याबाबत सोशल मिडीयावरुन नागरीकांना सूरक्षित राहण्याचे आवाहन केल्याने या समाज सेवकांच्या ‘जागरुकतेबद्दल’ प्रश्‍नचिन्ह निर्माण केला जात आहे. आपण समाजापर्यंत कोणता संदेश पोहोचवू पहात आहोत? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!