Type to search

Breaking News Featured नाशिक मुख्य बातम्या

गोंदेदुमाला येथील संचारानंतर आता वाडीवऱ्हेतही दिसला बिबट्या; परिसर दहशतीखाली

Share

वाडीवर्हे : वार्ताहर

इगतपुरी तालुक्यातील मुकणे, गोंदे दुमाला, वाडीवऱ्हे शिवहद्दीतील तीन पैकी एक बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात अडकल्याची घटना नुकतीच घडली होती. दरम्यान आज सकाळी पुन्हा वाडीवऱ्हे गावाजवळील गवताच्या शेतात दुसरा बिबट्या दिसल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली असुन ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली आहेत.

गोंदे दुमाला, मुकणे व वाडीवऱ्हे शिवहद्दीत बिबटयांचा वावर नित्याचाच झाला असून धरण क्षेत्र, ऊस व जंगल यामुळे वन्य प्राण्याबरोबर बिबट्यांचे भक्षासाठी गावाकडे व वस्तीच्या ठिकाणी फिरणे वर्षभरापासून नेहमीचे झाले आहे.

एक बिबट्या येतांना शेतावर जाणाऱ्या काही महिलांनी पाहिला असता त्यांचीही काहीवेळ भंबेरीच उडाली धरणाच्या दिशेने आलेला बिबट्या गावाजवळच असणाऱ्या गवताच्या शेतात घुसल्याने ग्रामस्थांनी घटनास्थळी एकच गर्दी केली.

या घटनेबाबत ग्रामस्थांनी इगतपुरी वनविभागाला कळविले असता वनविभागाच्या महिला वनरक्षक शालिनी पवार, पी.जी.साबळे यानी बिबट्या असणाऱ्या ठिकाणी भेट देऊन सदर ठिकाणी बिबट्याच आहे का..? याबाबत खात्री करण्यासाठी थांबुन राहिल्या मात्र गवताच्या शेतात दबा धरून बसलेला बिबट्या भरपूर वेळ झाला. तरी शेताबाहेर येत नव्हता तर सदर ठिकाणी बिबट्याच घुसला असल्याचे आम्ही पाहिल्याचे प्रत्यक्षदर्शी महिला सांगत होत्या.

दरम्यान, मुकणे, गोंदेदुमाला, वाडीवर्हे या तीन गावच्या शिवहद्दीत असल्याने अनेकदा मागणी करूनही वनविभाग याकडे गांभीर्याने पाहत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!