Type to search

Featured मुख्य बातम्या सार्वमत

ट्रकच्या धडकेत बिबट्या ठार

Share

राहुरी (तालुका प्रतिनिधी)- नगर-मनमाड महामार्ग ओलांडत असताना बिबट्याला अज्ञात ट्रकची बसल्याने तो जागीच ठार झाला. ही घटना नगर-मनमाड महामार्गावरील हॉटेल कुबेरनजिक साई टायर्सजवळ असलेल्या ओढ्याजवळ काल रविवारी (दि.15) रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

दरम्यान, या घटनेची खबर पत्रकार सुनील भुजाडी यांनी वनखात्याला दिल्यानंतर वनपाल लोंढे व सचिन गायकवाड यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठविला.
काल रात्री पावणेआठ वाजण्याच्या सुमारास एक बिबट्या नगर-मनमाड महामार्गावरील ओढ्याजवळील काटेरी झुडूपातून निघून महामार्ग ओलांडत असताना त्याला अज्ञात ट्रकने जोराची धडक दिली. यात त्याच्या तोंडाला जबर मार लागल्याने तो जागीच गतप्राण झाला. दरम्यान, डॉ. तनपुरे कारखान्याचे संचालक विजय डौले यांनी लोकांच्या मदतीने त्याचा मृतदेह बाजूला उचलून ठेवला. अपघात पाहण्यासाठी बघ्यांनी तोबा गर्दी केली होती. घटना समजताच पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

error: Content is protected !!